आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Babar Azam Enters Fielding With Keeping Gloves: Umpire Fines Pakistan 5 Runs; Pakistan Won The Match By 120 Runs

बाबर कीपिंग ग्लोव्ह्ज घालून उतरला क्षेत्ररक्षणात:अंपायरने पाकिस्तानला लावला 5 धावांचा दंड; पाकने 120 धावांनी जिंकला सामना

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी खेळाडू अनेकदा हसण्याचे पात्र बनतात. मग ते त्याचे वाईट इंग्रजी असो किंवा मैदानावरील वागणूक. शुक्रवारी पाकिस्तान-वेस्ट इंडिज वनडे सामन्यातही असेच घडले. जेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एका हातात विकेटकीपिंग ग्लोव्हज घालून मैदानात उतरला. त्याच्या चुकीमुळे मैदानावरील पंचांनी पाकिस्तानी संघावर 5 धावांचा दंड ठोठावला किंवा वेस्ट इंडिजला बोनस म्हणून 5 धावा दिल्या. हे प्रकरण 29 व्या षटकामधील आहे.

या पेनल्टीनंतर पाकिस्तानी चाहते त्याला ट्रोल करत आहेत. एकाने क्रिकेटच्या पुस्तकाचे उर्दूमध्ये भाषांतर करण्याची मागणी केली, जेणेकरून पाकिस्तानी खेळाडूंना क्रिकेटचे नियम चांगल्या प्रकारे कळू शकतील.

हा आहे नियम

क्रिकेटच्या नियम 28.1 अंतर्गत अंपायरने हा दंड दिला आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, यष्टिरक्षक वगळता कोणताही खेळाडू हातमोजे आणि बाह्य लेग गार्ड सारख्या गोष्टी घालू शकणार नाही. होय, परंतु फलंदाजाच्या सर्वात जवळचा खेळाडू हेल्मेट वापरू शकतो.

सामन्याच्या मध्यभागी घुसला फॅन

या सामन्यात पाकिस्तानी डाव सुरू असताना एका चाहत्याने सुरक्षा कठडे तोडून मैदानात प्रवेश केला. अशा स्थितीत सामना मध्येच थांबवावा लागला. मात्र, तो 39व्या षटकात शादाबची गळा भेट घेऊन लगेच परतला.

इमाम झाला 72 धावांवर धावबाद

पाकिस्तानी डावाच्या 28व्या षटकात इमाम-उल-हक 72 धावांवर बाद झाला. यामुळे संतापलेला इमाम विकेटवरच बॅट स्विंग करताना दिसला. इमाम अकील हुसेनला मिडविकेटच्या दिशेने खेळवले आणि एक रन घेण्याचा प्रयत्न केला. पण नॉन स्ट्राइक एंडला उभ्या असलेल्या कर्णधार बाबर आझमने अजिबात रस दाखवला नाही. तर इमाम दुसऱ्या टोकाला धावला आणि अशा स्थितीत इमामने परतण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र तो धावबाद झाला

वेस्ट इंडिजला 276 धावांचे लक्ष्य मिळाले

या पेनल्टीनंतर वेस्ट इंडिज संघाला 276 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, कॅरेबियन संघ 32.2 षटकांत केवळ 155 धावाच करू शकला. त्याच्याकडून एस ब्रूक्सने 42 धावा केल्या. काइल मेयरने 33 धावांचे योगदान दिले. पाक गोलंदाज मोहम्मद नवाजने 4 आणि मोहम्मद वसीमने 3 बळी घेतले.

तत्पूर्वी, पाकिस्तानच्या डावात कर्णधार बाबर आझमने 77 आणि इमाम-उल-हकने 72 धावांचे योगदान दिले. शादाब आणि खुशदिलने 22-22 धावा जोडल्या. अकिल हुसेनने तीन बळी घेतले. अल्जफरी जोसेफ आणि अँडरसन फिलिप्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

पाकिस्तानचा मोठा विजय

पाकिस्तान संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 120 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या विजयासह संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव केला होता.

बातम्या आणखी आहेत...