आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:‘नो एन्ट्री’नंतरही यंदा प्रेक्षकांची आयपीएलला पंसती; व्ह्यूअरशिपचे रॉकेट 28 टक्के सुसाट

मुंबई/बंगळुरू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनादरम्यान पहिली मोठी स्पर्धा पुढील वर्षी; टी-20 विश्वचषकाचे आयोजन

मंगळवारी समाप्त झालेल्या आयपीएलच्या १३ व्या सत्रात विक्रमी व्ह्यूअरशिप मिळाली. यंदाच्या व्ह्यूअरशिपमध्ये गत सत्राच्या तुलनेत २८ टक्क्यांनी वाढ झाली. फँटसी स्पोर्ट‌्सवर चाहत्यांचा वेळ आणि खेळ दोन्ही वाढले. यंदा फँटसी स्पोर्ट‌्सच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली. एफआयएफएस आणि केंटरच्या सर्व्हेनुसार, ६० टक्क्यांपेक्षा अधिक फँटसी वापरणाऱ्यांनी म्हटले की, लीगदरम्यान आम्ही फँटसी स्पोर्ट‌्सचा अधिक वापर केला. दुसरीकडे, लीगच्या मुख्य प्रायोजकानुसार, सामन्यादरम्यान ज्या चाहत्यांनी त्यांच्या फँटसी स्पोर्ट‌्सवर टीम तयार केली होती, त्यातील ७९ टक्के चाहत्यांनी खेळाडूंनी कशी कामगिरी केली,यासाठी सामने पाहिले. गत सत्राच्या तुलनेत फँटसी स्पोर्ट‌्सवर ट्रॅफिक व्हॉल्यूम ४४.४ टक्के वाढला. चाहत्यांसाठी यंदा टीमने व्हर्च्युअल वॉल बनवली होती.

कोरोनादरम्यान पहिली मोठी स्पर्धा पुढील वर्षी; टी-२० विश्वचषकाचे आयोजन

टी-२० विश्वचषकाचे पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजन केले जाणार आहे. आयसीसी व बीसीसीआयने गुरुवारी स्पर्धेची मुख्य अोळख जगासमोर जाहीर केली. या वेळी आयसीसीचे सीईओ मनू साहनीने म्हटले की, ‘दिवाळी दोन दिवसांवर आहे व भारतात होणाऱ्या स्पर्धेचे काउंटडाऊन सुरू झाले. ही मुख्य ओळख समोर ठेवण्याची योग्य वेळ आहे.’ बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले की, ‘भारतात आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाचे आयोजन सन्मानाची बाब आहे. भारताने १९८७ मध्ये विश्वचषकानंतर अनेक आयसीसी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.’ २००७ मध्ये सुरू झालेल्या टी-२० विश्वचषकाचे हे सातवे सत्र असेल. एकूण १६ संघ स्पर्धेत उतरतील. गत टी-२० विश्वचषक २०१६ मध्ये भारतात खेळवला गेला होता.

बातम्या आणखी आहेत...