आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनची मोबाइल कंपनी व्हिवो आयपीएलच्या मुख्य प्रायोजकातून बाहेर झाली आहे. आता स्पर्धेदरम्यान चीन कंपन्यांच्या जाहिराती टीव्ही व डिजिटल ठिकाणी दिसणार नाहीत. यात प्रामुख्याने व्हिवो, ओपो, रिअल मी, शाओमी, हुआवेसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. चीनविरुद्ध नागरिकांच्या नकारात्मक विचारामुळे विविध कंपन्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी टीव्ही आणि डिजिटल जाहिरातीतून स्टार इंडियाला २२०० कोटी रुपये मिळाले होते. व्हिवो व ओपेने गेल्या वर्षी जाहिरातीवर २४० कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, यंदा उत्सवाच्या काळात अधिक नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. १५०० ते १७०० कोटी रुपयांच्या जाहिराती प्रक्षेपणातून मिळू शकतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत २० ते ३० टक्के कमी असेल.
व्हिवो प्रो कबड्डी लीगच्या मुख्य प्रायोजकातून बाहेर
व्हिवोने प्रो कबड्डी लीगच्या मुख्य प्रायोजकातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. व्हिवोचा २०१७ ते २०२१ पर्यंत लीगसोबत ३०० कोटीचा करार होता. लीगला दरवर्षी ६० कोटी मिळत हाेते. कंपनी देशात प्रत्येक वर्षी जाहिरात व प्रमोशनवर १ हजार कोटी रुपये खर्च करत होती.
धोनीचा सराव; २२ ऑगस्टला संघ होणार रवाना
आयपीएल संघ २० ऑगस्टनंतर यूएईला रवाना होतील. चेन्नई सुपरकिंग्ज २२ ऑगस्ट रोजी रवाना होणार आहे. अनेक फ्रँचायझीने वेगवेगळ्या शहरांत राहणाऱ्या आपल्या खेळाडूंची कोविड-१९ चाचणी सुरू केली आहे. मंडळाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, एसओपीअंतर्गत यूएईला जाण्यापूर्वी सर्वांची पुन्हा एकदा चाचणी होईल. अनेक फ्रँचायझी ४ वेळा चाचणी करतील. खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्यास मनाई नाही, मात्र खेळाडू सुरुवातीला सोबत नेऊ इच्छित नाहीत. अनेक संघांनी वैद्यकीय टीम वाढवली. कारण, स्पर्धेदरम्यान प्रत्येक पाचव्या दिवशी चाचणी करण्यात येणार आहे. यादरम्यान चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रांचीमध्ये सराव सुरू केला आहे. रांची येथील इनडोअर हॉलमध्ये गोलंदाजी मशीनसोबत सराव केला. धोनीने गेल्या वर्षी जुलैमध्ये विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्याने निवृत्तीची घोषणा केली नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.