आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आयपीएल 2020:नव्या प्रायोजकांकडून 225 ते 250 कोटी रुपयांची अपेक्षा, गतवेळी मिळाले एकूण 618 कोटी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हॉटस्टार व जिअो टीव्हीसोबतचा करार समाप्त

बीसीसीआयला गेल्या वर्षी आयपीएलच्या प्रायोजकांकडून ६१८ कोटी रुपयांची कमाई झाली होती. ४४० कोटी व्हिवोकडून मिळाले होते, मात्र चिनी मोबाइल कंपनी या सत्रास प्रायोजक नाही. मंडळाला नव्या मुख्य प्रायोजकांकडून २२५ ते २५० कोटी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी पतंजली, अमेझॉन, बायजू, अन-अकॅडमीसह अनेक कंपन्या शर्यतीत आहेत. त्याचबरोबर ऑफिशियल पार्टनरचे ३ स्लॉट रिक्त आहेत. येथूनही मंडळाला ६०-७० कोटी रुपये मिळू शकतात. त्यानंतरही बीसीसीआयला प्रायोजकातून ५०० कोटी मिळण्याची शक्यता नाही. पाच नोव्हेंबर रोजी झालेल्या आयपीएल गव्हर्निंग काैन्सिलच्या बैठकीत सदस्यांमध्ये २०२० सत्रातील रिक्त स्लॉट भरण्याचा विचार केला गेला. मंडळाला मुख्य व इतर ऑफिशियल पार्टनरकडून यंदा ३०० कोटी रुपये मिळाले तरी, गेल्या सत्रापेक्षा १४० कोटी रुपये कमी असतील.

हॉटस्टार व जिओ टीव्हीसोबतचा करार समाप्त

जिओ टीव्ही ग्राहक आता आयपीएल २०२० चा आनंद घेऊ शकणार नाहीत. गेल्या सत्रात ज्या क्रिकेट चाहत्या जिओ सबस्क्रायबरकडे हॉटस्टार अॅप होते, ते जिओ टीव्हीवर फ्रीमध्ये लाइव्ह सामना पाहू शकत होते. आता तसे होणार नाही.

सीएसकेचा कर्णधार धोनीची कोरोना चाचणी निगेटिव्ह

कोरोना चाचणीसाठी चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नमुना रांची येथील त्यांच्या फार्म हाऊसवरून घेण्यात आला. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. तो १४ ऑगस्टला चेन्नईसाठी रवाना होईल. त्याच्यासोबत मोनू सिंगचेदेखील नमुने घेतले. १५ ते २० ऑगस्टपर्यंत टीमचे पूर्व सत्र शिबिर घेण्यात येणार आहे.