आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Fan Enters Ground To Meet Kohli, Gets Viral On Social Media Bio Bubble Protocol Break India Vs England 3rd Test

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामना::बायो-बबल प्रोटोकॉल तोडत कोहलीला भेटण्यासाठी थेट मैदानात गेला चाहता, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खेळाडूंना बाहेरील लोकांना भेटण्यास बंदी

भारत आणि इंग्लंडदरम्यान 4 कसोटी मालिकेतील तिसरा सामना अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडीयमवर सुरू आहे. बुधवारी विराट कोहलीच्या एका चाहत्याने त्याला भेटण्यासाठी बायो-बबल तोडत थेट मैदानात प्रवेश केला. घटनेच्या वेळी भारतीय संघ फलंदाजी करत होता. मैदानावर रोहीत शर्मा आणि कर्णधार विराट कोहली उपस्थित होते. चाहत्याने कोहलीकडे जाताच कोहलीने त्याला दूर राहायचे सांगितले. यानंतर तो चाहता परत स्टँड्समध्ये गेला.

खेळाडूंना बाहेरील लोकांना भेटण्यास बंदी

आयसीसीच्या नियमनुसार, कोरोना काळात खेळाडू आणि मॅच अधिकाऱ्यांना बाहेरील लोकांना भेटण्यास बंदी आहे. खेळाडूंना बायो-बबल प्रोटोकॉलमध्येच सामन्याचे प्रशिक्षण घ्यावे लागत आहे. अहमदाबादामधील मोटेरा स्टेडीयमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जवळपासा 50 हजार प्रेक्षक उपस्थित आहेत.

मालिकेत इंग्लंड आणि भारत बरोबरीत
चार कसोटी सामनांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 गुणांसह बरोबरीत आहेत. सुरुवातीचे दोन्ही कसोटी सामने चेन्नईमध्ये झाले होते. पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला 227 धावांनी पराूत केले होते. तर, दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडला 317 धावांनी पराभूत केले.

बातम्या आणखी आहेत...