आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शार्दुलच्या तुफानी अर्धशतकाचे कौतुक:36 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार मारणाऱ्या शार्दुलला चाहत्यांनी 'लॉर्ड' असे नाव दिले, म्हणाले- गोलंदाज समजले मात्र योद्धा निघाला

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळला जात आहे. जिथे पहिल्या दिवसाच्या सामन्यात टीम इंडिया फक्त 191 धावांच्या जवळ पोहचू शकली. भारताने 191 धावा केल्या, मात्र शार्दुल ठाकूर संघासाठी फलंदाजीने छाप पाडण्यात यशस्वी ठरला आहे. ठाकूरने आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली.

आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने फक्त 36 चेंडूत 57 धावांची शानदार खेळी केली. शार्दुलने त्याच्या डावात सात चौकार आणि तीन षटकारही लगावले. विशेष म्हणजे त्याने आपले अर्धशतक अवघ्या 31 चेंडूत पूर्ण केले. भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील कोणत्याही खेळाडूचे दुसरे सर्वात जलद अर्धशतक राहिले.

सोशल मीडियावर शार्दुलचे कौतुक

शार्दुल जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा संघाचा स्कोअर 117 धावांवर 6 विकेट्स होत्या. असे वाटत होते की भारत 150 चा आकडाही पार करू शकेल, पण शार्दुल ठाकूरने आपल्या स्फोटक फलंदाजीने संघाचा स्कोअर 200 च्या जवळ आणला. ठाकूरच्या फलंदाजीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुकही झाले. क्रिकेट तज्ज्ञांनी त्याच्या धाडसी खेळीचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...