आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:धोनीसाठी आयोजित होऊ शकतो निरोप सामना, आयपीएलनंतर नियोजन होणार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धोनीने देशासाठी खूप काही दिले आहे, तो सन्मानाचा हक्कदार - बीसीसीआय

बीसीसीआय देशाला गर्व व आनंदाचे १६ वर्षे देणाऱ्या माजी कर्णधार महेेंद्रसिंग धोनीसाठी निरोप लढतीच्या आयोजनाचा विचार करत आहे. मंडळाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, ‘सध्या आंतरराष्ट्रीय मालिका नाही. मात्र, आयपीएलनंतर काय करता येईल, ते पाहू. धोनीने देशासाठी खूप काही दिले आहे, त्याला सन्मानाचा हक्कदार आहे. आम्ही धोनीबरोबर याबाबत अद्याप चर्चा केली नाही. आम्ही आयपीएलदरम्यान त्याच्याशी चर्चा करू.’ २००४ मध्ये पदार्पण करणारा धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. माजी क्रिकेटपटू मदन लालने देखील धोनीसाठी अखेरच्या सामन्याच्या आयोजनाचे समर्थन केले. त्याने म्हटले, “मंडळ भारतात एका मालिकेचे आयोजन करू शकतो, कारण लोक त्याला स्टेडियममध्ये लाइव्ह पाहू शकतील.’ ३९ वर्षीय धोनीने ३५० वनडे, ९० कसोटी व ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीची घोषणा करत सर्वांना आश्चर्यचकीत केले होते.

बातम्या आणखी आहेत...