आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेटमध्ये पुनरागमन:सात वर्षांच्या बंदीनंतर वेगवान गोलंदाज श्रीसंत पुढील महिन्यात मैदानावर उतरणार, स्पॉट फिक्सिंगमुळे घालण्यात आली होती बंदी

तिरुवनंतपुरम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीसंतची सप्टेंबरमध्ये बंदी झाली समाप्त; केरळमध्ये डिसेंबर महिन्यात टी -20 स्पर्धा होऊ शकते

वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करण्याच्या तयारी आहे. स्पॉट फिक्सिंगमुळे श्रीसंतवर ७ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ती सप्टेंबरमध्ये समाप्त झाली. केरळ क्रिकेट संघटना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात टी-२० स्पर्धा आयोजनाची तयारी करत आहे. श्रीसंत देखील या स्पर्धेत उतरेल. मात्र, स्पर्धा आयोजनासाठी अद्याप राज्य सरकारची परवानगी मिळाली नाही. श्रीसंत २००७ आणि २०११ विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य आहे. त्याने कसोटीमध्ये ८७ बळी घेतले आहेत. केरळ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष साजन के वर्गीस यांनी म्हटले की, स्पर्धेत श्रीसंत खेळणार आहे. सर्व खेळाडू हॉटेलमध्ये जैव सुरक्षित वातावरणात राहतील. आम्ही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्पर्धा घेण्याचे नियोजन करत आहोत. मात्र, अद्याप राज्य सरकारकडून परवानगी मिळालेली नाही. त्यांनी म्हटले की, लीगसाठी फॅटेन्सी स्पोर्ट््स सोबत करार केला आहे. लीग प्रकारात स्पर्धेचे आयोजन केेले जाईल. यात राज्यातील विविध वयो गटातील टीम खेळतील. सध्या केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. त्याचाही विचार केला जाईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser