आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी- 20:भारत-इंग्लंड यांच्यात आज पाचवा सामना; निर्णायक लढतीत भारताचे वर्चस्व

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताचा 2017, 2018 मध्ये इंग्लंडवर निर्णायक विजय

यजमान टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील निर्णायक शेवटचा पाचवा टी-२० सामना आज शनिवारी अहमदाबादच्या मैदानावर हाेणार आहे. प्रत्येकी दाेन विजयासह या दोन्ही संघांनी मालिकेत २-२ ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता मालिका विजयाच्या इराद्याने दोन्ही संघ आज आपले काैशल्य पणास लावणार आहे. गत सामना जिंकून यजमान टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधली. आता कसाेटीपाठाेपाठ टी-२० मालिकाही आपल्या नावे करण्याचा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा मानस आहे. यासाठी टीम इंडियाचे युवा खेळाडू सरस खेळी करून फाॅर्मात आले आहेत. युवा फलंदाज सूर्यकुमार यादव आणि शार्दूल ठाकूरने चौथ्या टी-२० सामन्यात लक्षवेधी खेळी करून आपाल्यातील क्षमता सिद्ध केली. त्यामुळे आता याच युवांवर टीमच्या विजयाची मदार असेल.

भारतीय संघ आता मालिका विजयासह आपल्याच घरच्या मैदानावर हाेणारा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा दावा मजबूत करणार आहे. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनने दमदार पदार्पण करताना इंग्लंडच्या गोलंदाजीचा धाडसाने सामना करताना स्फाेटक फलंदाजी केली. त्यामुळे त्यांनी टीमच्या विजयाचे पारडे अधिक जड असल्याचे सिद्ध केले. दुसरीकडे चहलच्या जागी चौथ्या सामन्यात खेळण्याची चहलला संधी मिळाली. यालाच सार्थकी लावताना त्याने शानदार कामगिरी केली.

भारताचे ९ पैकी ८ निर्णायक विजय; एक सामना गमावला
टीम इंडियाने टी-२० मध्ये नऊ निर्णायक सामने खेळले आहेत. यातील आठ निर्णायक लढतीत विजयी पताका फडकावण्याचा पराक्रमही टीम इंडियाला गाजवता आला. यातील एकाच लढतीत टीमचा पराभव झाला. २०१९ मध्ये न्यूझीलंडने निर्णायक सामन्यात टीम इंडियावर मात केली हाेती. निर्णायक लढतीतील आपले वर्चस्व राखून ठेवताना टीम इंडियाने २०१७ व २०१८ मध्ये इंग्लंडला धूळ चारली. आता हाच निर्णायक विजयाचा कित्ता गिरवण्याचा टीमचा प्रयत्न असेल.

इंग्लंडवर दंडात्मक कारवाई : चौथ्या सामन्यातील संथ गोलंदाजी पाहुण्या इंग्लंड टीमला महागात पडली. यासाठी टीमला माेठी किंमत माेजावी लागली. स्लाे आेव्हर रेटप्रकरणी आयसीसीने इंग्लंडवर दंडात्मक कारवाई केली. निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्याप्रकरणी इंग्लंडला सामनानिधीच्या २० टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...