आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूएस ओपन:पाचव्या मानांकित रुडने इटलीच्या मॅटिओ बेरेटिनीचा सलग सेटमध्ये केला पराभव

न्यूयाॅर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नॉर्वेच्या रुडने प्रथमच उपांत्य फेरीत इटलीच्या खेळाडूला चौथ्यांदा हरविले

नॉर्वेजियन टेनिसपटू कॅस्पर रुडने यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. २३ वर्षीय खेळाडूने प्रथमच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली, तर दुसऱ्यांदा ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. याआधी ताे फ्रेंच ओपन २०२२ च्या विजेतेपदाच्या लढतीपर्यंत पोहोचला हाेता. मात्र त्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित रुडने इटलीच्या १३व्या मानांकित मॅटिओ बेरेटिनीचा सलग सेटमध्ये ६-१, ६-४, ७-६ असा पराभव केला. हे दोन्ही खेळाडू सहाव्यांदा आमनेसामने आले होते. रुडचा बेरेटिनीविरुद्धचा हा चौथा आणि वर्षातील सलग दुसरा विजय आहे. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना कॅरेन खाचानोव्हशी होणार आहे. २७व्या मानांकित खाचानोव्हने अव्वल मानांकित डॅनिल मेदवेदेवचा ७-५, ४-६, ७-५, ६-७, ६-४ असा पाच सेटमध्ये पराभव करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा पराभव केला. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत ओन्स जबूरने ऑस्ट्रेलियाच्या आयला टोमानोविचचा ६-४, ७-६ ने पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...