आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॅश लीग:फिंचचे अर्धशतक; रेनेगेड्स संघ विजयी

मेलबर्न2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅराेन फिंचने (७०) झंझावाती अर्धशतकी खेळीतून यजमान मेलबर्न रेनेगेड्स संघाला बिग बॅश लीगमध्ये सलग दुसरा विजय मिळवून दिला. रेनेगेड्स संघाने रविवारी सामन्यात सिडनी थंडर टीमचा पराभव केला. रेनेगेड्स संघाने ४ गड्यांनी सामना जिंकला. या विजयासह टीमने चार गुणांची कमाई करताना गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानी धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना सिडनी थंडर संघाने ६ बाद १७४ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात मेलबर्न रेनेगेड्स संघाने १९.५ षटकांत सहा गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. संघाच्या विजयासाठी फिंचने १६२.७९ च्या स्ट्राइक रेटने ४३ चेंडूंत नाबाद ७० धावा काढल्या. यामध्ये सात चाैकार आणि दाेन षटकारांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...