आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायजमान भारतीय संघाच्या विजयी माेहिमेला ब्रेक लावत श्रीलंका संघाने गुरुवारी पुण्याच्या मैदानावर दुसरा टी-२० सामना जिंकला. १६ धावांनी विजय संपादन करत श्रीलंका संघाने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. आता मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज शनिवारी हाेणार आहे. राजकाेटच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका हे दाेन्ही संघ शेवटच्या सामन्यात समाेरासमाेर असतील. या हायस्काेअरिंग सामन्यात भारतीय संघाला १९० धावांपर्यंत मजल मारता आली. यातून टीम इंडियाला पराभवासह आता टीकेलाही सामाेरे जावे लागत आहे. यादरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम गाेलंदाजीच्या निर्णयापासून सात नाे बाॅल प्रकरण आता चांगलेच चर्चेत आले आहे. मात्र, यादरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्याच निर्णयाची पाठराखण केली. इतिहास पाहून मी निर्णय घेत नाही. नव्याने निर्णय घेतल्याची कबुली त्याने दिली. पुण्याच्या याच मैदानावर ६४ पैकी ३५ सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयाची नाेंद करता आली.
नाे बाॅलवर काेच-कर्णधारांमध्ये दुमत
नाे बाॅल ठरताे गुन्हा : हार्दिक
अशा चुका हाेत असतात: द्रविड
श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी-२० सामना गुरुवारी पुण्याच्या मैदानावर खेळवला गेला. या सामन्यादरम्यान यजमान टीम इंडियाच्या गाेलंदाजांनी सुमार खेळी केली. यादरम्यान भारताच्या गाेलंदाजांनी सात नाे बाॅल टाकले. यामध्ये एकट्या अर्शदीपने पाच नाे बाॅल टाकले. यातून त्याच्यावर माेठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. मात्र, याच नाे बाॅलबाबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि प्रभारी कर्णधार हार्दिक पंड्या यांच्यात दुमत आहे. यादरम्यान नाे बाॅल टाकणे हे गुन्ह्यासारखेच आहे. अशा प्रकारचा गुन्हा हा संघासाठी चांगलाच महागात पडताे, हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. त्यामुळे नाे बाॅल टाकणे गाेलंदाजांच्या दृष्टीने चुकीचे मानले जाते, अशा शब्दांत कर्णधार हार्दिकने नाे बाॅलबाबतची आपली प्रतिक्रिया दिली. मात्र, यादरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने नाे बाॅल टाकणाऱ्या गाेलंदाजांची पाठराखण केली. नाे बाॅल टाकणाऱ्या गाेलंदाजांना आता पाठबळ देण्याची गरज आहे. यातून त्यांच्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यास मदत हाेईल. त्यामुळे त्यांना आता मानसिकदृष्टया पाठबळ दिले पाहिजे, अशा शब्दांत द्रविडने या गाेलंदाजांची पाठराखण केली आहे. मालिकेतील शेवटचा तिसरा निर्णायक टी-२० सामना शनिवारी राजकाेटच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. सध्या मालिका १-१ ने बराेबरीत आहे.
श्रीलंकन माजी आॅलराउंडर महारूफ यांचा युवा गाेलंदाजांना माैलिक सल्ला
सरावादरम्यान वेगवान गाेलंदाज फ्रंट फूटवर फाेकस करत नाहीत. त्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळेच माेठ्या प्रमाणात नाे बाॅल पडतात. याशिवाय अनेक दिवसांच्या ब्रेकचाही माेठा फटका बसताे. यामुळे गाेलंदाज फाॅर्मात येण्यासाठी उशीर लागताे. यातूनही नाे बाॅल पडत असतात, अशा शब्दांत श्रीलंका संघाचे माजी आॅलराउंडर महारूफ यांनी युवा गाेलंदाजांना कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठीचा माैलिक सल्ला दिला. आता युवा खेळाडूंनी सराव करताना दुबळी बाजू दुर करण्यावर काम करण्याची गरज आहे. द्रविडने नाणेफेक जिंकून प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला. हाच निर्णय यजमान टीम इंडियासाठी चांगलाच महागात पडला. यातून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने २०६ धावा काढल्या. मात्र, प्रत्युत्तरात टीम इंडियाला १९० धावांपर्यंतच मजल मारता आली. द्रविडच्या या निर्णयावर माेठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. द्रविडचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.