आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिली कसाेटी:नऊ वर्षांनंतर इंग्लंडच्या फलंदाजाचे आशियामध्ये सलग 3 सामन्यांत 3 शतके; रुटची नाबाद खेळी

चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंग्लंड संघाच्या दिवसअखेर 3 बाद 263 धावा, कर्णधार रुटच्या नाबाद 128 धावा

सलामीवीर डाॅम सिब्लेने साजरे केले अर्धशतक; तिसऱ्या विकेटसाठी रुटसाेबत द्विशतकी भागीदारी इंग्लंड टीमचा कर्णधार जो रुटने (१२८*) संयमी खेळीची लय कायम ठेवताना आपले आशियातील मैदानावरचे वर्चस्व अबाधित ठेवले. यातून त्याने यजमान टीम इंडियाविरुद्ध सलामी सामन्यात चेन्नईच्या मैदानावर नाबाद शतकी खेळी केली. त्याने नाबाद १२८ धावांची खेळी केली. याची शतकी खेळीच्या बळावर इंग्लंड संघाने शुक्रवारी भारतविरुद्ध सलामी कसाेटीच्या पहिल्या डावात दिवसअखेर तीन गड्यांच्या माेबदल्यात २६३ धावा काढल्या. यामध्ये टीमच्या सलामीवीर डाॅम सिब्लेचे माेलाचे याेगदान आहे. त्याने ८७ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय सिब्लेने आपल्या टीमच्या कर्णधार रुटसाेबत तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचली. यातून त्यांनी टीमच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. यजमान भारताकडून जसप्रीत बुमराहने दाेन आणि आर.अश्विनने एक बळी घेतला. इतर गाेलंदाजांना मात्र पहिल्या दिवशी यश मिळाले नाही.

पाहुण्या इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान टीमला सलामीच्या राॅरी बर्न्स (३३) आणि सिब्लेने दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. यादरम्यान रुटने करिअरमधील २० वे कसोटी शतक झळकावत इंग्लंडला पहिल्या कसोटीत मजबूत स्थितीत पोहोचवले. आता टीमचा रुट मैदानावर कायम आहे. दरम्यान टीमच्या तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी असलेल्या लाॅरेन्सने सर्वांची निराशा केली. ताे आल्यापावलीच पॅव्हेिलयनमध्ये परतला. त्याला जसप्रीत बुमराहने पायचीत केले. यासह त्याने इंग्लंडच्या टीमला माेठा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या रुटने संघाचा डाव लगेच सावरला. यातून टीमच्या धावसंख्येला गती मिळाली.

रुटचे सलग तिसरे शतक :
रुटने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्ध कसाेटी मालिकेतही उल्लेखनिय कामगिरी केली. या मालिकेतील दोन कसोटीत दोन शतके झळकावली होती. आशियात ९ वर्षांनी इंग्लिश फलंदाजाने सलग ३ कसोटीत ३ शतके काढली. यापूर्वी २०१२ मध्ये अॅलिस्टर कुकने अशी कामगिरी केली होती. रुट भारतात सातवी कसोटी खेळत आहे. त्याने प्रत्येक सामन्यात ५०+ धावा काढल्या आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदा देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाले आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

१०० व्या कसोटीत शतक; रुट जगात नववा
सिब्ले आणि रॉरी बर्न्सने (३३) पहिल्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी केली. लॉरेन्स (०) खातेही उघडू शकला नाही. त्यानंतर रुट आणि सिब्लेने २०० धावांची भागीदारी करत संघाला २५० धावांचा टप्पा गाठून दिला. दिवसअखेरच्या तिसऱ्या चेंडूवर बुमराहने सिब्लेला पायचीत करत संघाला यश मिळवून दिले. रुटची ही १०० वी कसोटी आहे. तो १०० व्या कसोटीत शतक करणारा जगातील नववा आणि इंग्लंडचा तिसरा खेळाडू बनला. यापूर्वी कॉलिन क्रॉलेने १९६८ आणि एलेक स्टुअर्टने २००० मध्ये अशी कामगिरी केली होती. रुट इंग्लंडकडून १०० कसोटी खेळणारा १५ वा खेळाडू बनला.

इंग्लंडच्या भारतात पहिल्या डावात सलग १४ व्या वेळी २५०+ धावांची नाेंद
इंग्लंडने सलग १४ व्या वेळी भारतात २५०+ धावा काढल्या आहेत. मात्र, यात १ विजय मिळवता आला होता. ७ सामन्यांचा त्यांचा पराभव झाला व ५ सामने बरोबरीत सुटले. आता इंग्लिश संघ ५०० धावांचा टप्पा गाठू इच्छितो. ९ वर्षांनी इंग्लिश जोडीने भारताविरुद्ध २००+ धावांची भागीदारी केली. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची आहे.

बातम्या आणखी आहेत...