आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगातील क्रीडा क्षेत्राला माेठा फटका बसला आहे. त्यातून महिला क्रिकेट देखील कसे सुटणार. या महामारीमुळे महिला क्रिकेटवर मोठा परिणाम झाला आहे. आगामी काळात मैदानावर उतरण्यापूर्वी फिटनेस राखणे महत्त्वाचे आहे, असे मत राष्ट्रीय क्रिकेटपटू पूजा तोडकर यांनी व्यक्त केले.
महिला क्रिकेटपटूंसाठी एप्रिल-मे महिन्यातील सत्र महत्त्वाचे असते. यंदा कोरोनामुळे ते वाया गेले. त्याचा परिणाम महिला क्रिकेटवर निश्चित होईल. आम्ही वर्षभर केलेल्या मेहनतीतून काही चुका राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याची संधी यादरम्यान असते. कारण या कालावधीत संघटनेतर्फे सामन्याचे आयोजन केले जाते. त्यात आम्हाला प्रदर्शन करण्याची संधी मिळते. नेमकी तीच वेळ आमच्या हातून निघून गेली आहे. लॉकडाऊनमुळे सध्या घरीच फिटनेसवर लक्ष केंद्रित केेले आहे. मी फिरकीपटू असल्याने चेंडू स्विंग करण्यासाठी चेंडू रिड्यूजवर काम करतेय. त्यामुळे चेंडूवरील बोटाचे नियंत्रण कायम राहील, असे तोडकर यांनी म्हटले.
क्रिकेट सुरू होण्यापूर्वी स्वत:ला फीट करा :
लॉकडाऊनमुळे प्रत्येक खेळाडूच्या फिटनेसवर परिणाम झाला आहे. अनेक जण घरीच आपापल्या पद्धतीने सराव करताहेत. मात्र, मैदानावरील नियमित सराव व घरचा सराव यात खूप मोठा फरक आहे. बाहेर सराव बंद असल्याने घरीच कार्डिओ, स्किपिंग, हेरा बॅण्ड, फुटवर्क, फलंदाजी तंत्र आदींवर मेहनत घेत आहे. मैदानात उतरण्यापूर्वी फिटनेस गरजेचा आहे. मैदानावर उतरण्याची घाई केल्यास दुखापतीचा धोका निर्माण होऊ शकतो, असे तोडकर यांनी म्हटले. खेळाडूंसह इतर सर्वांनीच तंदुरुस्ती व रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याकडे लक्ष द्यायला हवे, तरच कोरोनापासून आपण वाचू, असे त्यांनी म्हटले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.