आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Football In 'Zero Gravity', Figo Scores A Goal: Match Played At 20,000 Feet, Recorded In Guinness Book

'झिरो ग्रॅव्हिटी'वर फुटबॉल, फिगो ने केला गोल:20 हजार फूट उंचीवर खेळला गेला सामना, गिनीज बुकमध्ये झाली नोंद

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही अनेक खेळाडूंना मैदानावर सायकल किकचा सराव करताना पाहिले असेल. त्यांच्यापैकी बरेच जण जखमी देखील होतात, का होणार नाही... कारण हे करणे खरंच खूप कठीण असते. या अडचणीचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आहे.

समजा आपण फुटबॉल 'झिरो ग्रॅव्हिटी'वर खेळला गेला तर सायकल किक करणे सोपे जाईल. सायकलमध्ये खेळाडूला हवेत उडी मारून पाठीमागे किक मारावी लागते.

रविवारी अशीच एक सायकल किक पाहायला मिळाली. जेव्हा फुटबॉलचा सामना ('झिरो ग्रॅव्हिटी'वर )शून्य गुरुत्वाकर्षणावर खेळला गेला. कारण, त्यावेळी खेळाडू हे हवेत तरंगत होते. हा सामना 20 हजार 230 फूट उंचीवर खेळला गेला.

यात पोर्तुगालचा माजी फुटबॉलपटू लुइस फिगोही खेळताना दिसला. या खेळाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली. फिगो आणि त्याच्या संघाने हा सामना 2-1 असा जिंकला. न्युज एजेन्सी रॉयटर्सने त्याचा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे.

सर्वोच्च उंचीवरच्या फुटबॉल सामन्यात 3 गोल

सामन्यासाठी खेळाडूंना विमानातून 20 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर नेण्यात आले. हा सर्वाधिक उंचीवरचा फुटबॉल सामना होता. सामन्यादरम्यान खेळाडू हवेत उडताना दिसले. त्यानंतरही या रोमांचक सामन्यात 3 गोलची नोंद झाली. फिगोनेही एक गोल केला.

येथे खेळणे कठीण आणि रोमांचक होते: फिगो

या विजयानंतर फिगो म्हणाला- 'परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. येथे खेळणे खरंच खूप कठीण आणि रोमांचक असे होते. इथे तुम्हाला जे करायचे आहे ते होईलच असे नाही, तुम्ही अपयशी देखील होऊ शकता. सर्वसाधारणपणे गोष्टी तुमच्या नियंत्रणात असतात मात्र इथे तसे काही नव्हते.

बातम्या आणखी आहेत...