आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • For The First Time In A Decade Since 1940, There Has Been A Decline In Test Cricket Planning, And A Decline In ODIs

नवी दिल्ली:1940 नंतर पहिल्यांदा दशकामध्ये कसाेटी आयाेजनात घसरण, वनडेही झाले कमी

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टी-20 लीगचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर, 31 कसोटी व 118 वनडे कमी झाले

ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीजदरम्यान ऑक्टोबरमध्ये होणारी तीन सामन्यांची टी-२० मालिका रद्द करण्यात आली आहे. आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या आयपीएलदरम्यान कोणताही आंतरराष्ट्रीय सामना होणार नाही. टी-२० लीग सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कार्यक्रमावरदेखील त्याचा परिणाम दिसत आहे. १९४० नंतर पहिल्यांदा या दशकात म्हणजे २०१० ते २०१९ दरम्यान सर्वात कमी कसोटी झाल्या. वनडे सामन्यातदेखील घसरण झाली. लीगमधून खेळाडूंची मोठी कमाई होते. त्यामुळे हे क्रिकेट वाचवण्यासाठी आयसीसीने वर्ल्ड चॅम्पियनशिप सुरू केली.

बॉर्डर, अख्तरकडून आयपीएल आयोजनावर प्रश्नचिन्ह

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलेन बॉर्डरने म्हटले की, बीसीसीआयच क्रिकेट चालवत आहे. त्यामुळे आयपीएलला महत्त्व दिले जात आहे. विश्वचषकाला घरच्या स्पर्धेसारखा दर्जा दिला जातोय. आपण आपल्या खेळाडूंना त्यात खेळण्यापासून रोखले पाहिजे. शोएब अख्तरने म्हटले की, आयपीएलमुळे आशिया कप स्थगित केला.

२००८ च्या आयपीएल यशाने इतर देशांना दिली संधी

बीसीसीआयने २००८ मध्ये आयपीएलची सुरुवात केली. आज मंडळाची ९० टक्के कमाई आयपीएलमधून होते. आयपीएलचे यंदाचे सत्र न झाल्यास बीसीसीआयला जवळपास ४ हजार कोटींचे नुकसान होईल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने २०११ मध्ये बिग बॅश लीग, विंडीजने २०१३ मध्ये सीपीएल व पाकने २०१६ मध्ये पीएसएलची सुरुवात केली.

तरीही टी-२० आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली ७००% वाढ

टी-२० लीगमुळे कसोटी व वनडे सामने कमी होत आहेत. मात्र, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात कमतरता झाली नाही. २००० च्या दशकात जेथे १६ संघांमध्ये १२७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने झाले. २०१० च्या दशकात संघाची संख्या वाढत ७२ आणि सामन्यांची संख्या ८९७ झाली. दशकात टी-२० सामन्यांची संख्या ७०० टक्क्यांनी वाढली.

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान टी-२० मालिका होणार नाही :

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार होती. मात्र, यादरम्यान यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन होणार आहे. अशात ही मालिका होणार नाही. टीम इंडिया डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार होती. यादरम्यान संघाला चार कसोटी व तीन वनडे सामन्यांची मालिका खेळायची होती.