आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाॅकडाऊन:झिम्बाव्वेचे माजी कर्णधार टेलर दिवसभरात 20 वेळा हात धुतात

हरारे 3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • दाेन आठवड्यांपासून घेत आहेत स्वयंपाकाचे धडे

लाॅकडाऊनमुळे घरीच राहावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये मी सध्या दाेन आठवड्यांपासून घरीच बसून आहे. अशात मी उत्तम प्रकारचा आणि तरबेज असा कुक झालाे आहे. यादरम्यान मी घरीच स्वयंपाक करण्याचे धडे गिरवले. याशिवाय मी काेराेनाचा धाेका टाळण्यासाठी दिवसभरात जवळपास १५ ते २० वेळा हात धुताेे. याबाबतची काळजी इतरांनीही घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया झिम्बाव्वेचे अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार ब्रेंडन टेलर यांनी दिली. मी फावल्या वेळात अनेक जुने चित्रपटही पाहत आहे. तसेच खेळाडूंना काेचिंग करत आहे, असेही ते म्हणाले. 

काेराेना व्हायरसमुळे सध्या जगभरात लाॅकडाऊन आहे. त्यामुळे स्पाेर्ट््सच्या सर्वच इव्हेंटला स्थगिती देण्यात आली. यातूनच अनेक खेळाडू हे सध्या घरीच आहेत.

बातम्या आणखी आहेत...