आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Four Members Of The Indian Team's Support Staff, Including The Head Coach, Are In Isolation, The Match Will Not Be Affected; News And Live Updates

रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह:मुख्य प्रशिक्षकासह सपोर्ट स्टाफचे 4 सदस्य आयसोलेशनमध्ये, बीसीसीआयने ट्विट करत दिली माहिती

लंडन18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वांची करण्यात आली होती RT-PCR चाचणी

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. दरम्यान, आज ओव्हल कसोटीचा चौथा दिवस सुरू होण्याआधी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाचे सपोर्ट स्टाफचे 4 सदस्य कोरोनाबाधित आढळले आहे. खबरदारीचे उपाय म्हणून आयोजकांनी संक्रमितांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. विशेष म्हणजे 4 सदस्य कोरोनाबाधित आढळल्यानंतरही भारत आणि इंग्लंड दरम्यानचा सामना रद्द करण्यात आला नाही.

सर्वांची करण्यात आली होती RT-PCR चाचणी
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असल्याचे बीसीसीआयने याबाबत एक प्रसिद्धी पत्रक जारी करत म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वी सर्व खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती.

जोपर्यंत वैद्यकीय टीमकडून पुष्टी होई नाही, तोपर्यंत त्यांना टीम इंडियासोबत प्रवास येणार नाही असे बीसीसीआयने म्हटले आहे बीसीसीआयने पुढे म्हटले की, भारतीय संघाचे गेल्या रात्री आणि सकाळी असे दोन वेळा फ्लो टेस्ट करण्यात आले. ज्या खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आली त्यांना या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

चौथ्या सामन्यात भारत पुढे
भारत आणि इंग्लंड संघादरम्यान 5 कसोटी सामन्यांचे यावेळी आयोजन करण्यात आले. तिसऱ्या दिवशीच्या सामन्यात भारतीय संघाचे स्कोर 3 बाद 270 धावा होत्या. तिसऱ्या दिवशीच्या सामन्यात भारत 171 धावांनी पुढे आहे. यामुळे हा सामना सध्यातरी भारतीय संघाच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...