आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:चाैथी कसाेटी ‘चाैथ्या’खेळपट्टीवर; लाल मातीवर पुन्हा फिरकीची चमक

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्या गुरुवारपासून अहमदाबाद येथे मालिकेतील शेवटची व चौथी कसाेटी

यजमान टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील चाैथ्या कसोटीला उद्या गुरुवारपासून सुरुवात हाेणार आहे. मालिकेतील या चौथ्या आणि निर्णायक कसोटीसाठी आता लाल मातीची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. चौथी कसोटी आता स्टेडियमवरील चौथ्या नंबरच्या पिचवर खेळवण्यात येणार आहे. या पिचसाठी खास लाल मातीचा वापर करण्यात आला. म्हणजेच ही लाल मातीची पिच आता फिरकीपटूंसाठी फायदेशीर ठरणारी आहे. गत तिसऱ्या कसोटीसाठीही लाल मातीची पिच तयार करण्यात आली हाेती. यावर चमकदार कामगिरी करताना फिरकीपटूंनी पाच दिवसांचा कसोटी सामना अवघ्या पावणेदाेन दिवसांत संपवून टाकला. या कसोटीत ३० पैकी २८ विकेट या फिरकीपटूंनी घेतल्या हाेत्या. त्यामुळे ही पिच अधिकच चर्चेत राहिली. आताही लाल मातीची खेळपट्टी असणार आहे.

आॅस्ट्रेलिया दाैऱ्यानंतर पुजाराची घसरण; शतकी खेळीमध्ये ठरला अपयशी
टीम इंडियाचा चेतेश्वर पुजाराने २०१८-१९ च्या आॅस्ट्रेलियन दाैऱ्यात चार कसोटीच्या सात डावांत ५२१ धावा काढल्या हाेत्या. त्याने १९३ धावांची सर्वोच्च खेळी केली हाेती. मात्र, त्यानंतर १६ सामन्यांतील २७ डावांत त्याला २९.६६ च्या सरासरीने ८०१ धावांची कमाई करता आली. या ठिकाणी त्याची ८१ धावांची सर्वोच्च खेळी ठरली. तसेच ताे तीन वेळा शून्यावर बाद झाला हाेता. या मालिकेत त्याने ७३, १५, २१ आणि ० अशी खेळी केली हाेती. त्याला जॅक लिचने तीन वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

समजदार असलेल्या अश्विनमध्ये प्रचंड क्षमता : लक्ष्मणकडून कौतुकांचा वर्षाव
सातत्याने नावीन्यपूर्ण खेळी करून अश्विन हा टीमसाठी उल्लेखनीय कामगिरी करताे. प्रत्येक संकट आणि अडचणीच्या परिस्थितीमध्ये सावध खेळी करण्याची माेठी समज ही त्याच्यात आहे. प्रचंड मेहनत घेण्याची इच्छाशक्ती आणि संकटातही स्वत:ला सिद्ध करण्याची क्षमताच त्याचे वेगळेपण दाखवून देते, अशा शब्दांत टीम इंडियाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने फिरकीपटू आर.अश्विनवर काैतुकाचा वर्षाव केला. गोलंदाजीत सरस खेळी करण्यात तरबेज असलेल्या अश्विनने आता फलंदाजीचा दर्जा उंचावला. कसदार आणि अनुभवी फलंदाजांसारखी माेठी खेळी करण्यातही आपण तरबेज असल्याचे अश्विनने मालिकेत दाखवून दिले, असेही ताे म्हणाला.

58 वर्षीय शास्त्रींना लस
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मंगळवारी अहमदाबाद येथील अपाेलाे रुग्णालयामध्ये काेराेना व्हॅक्सिन घेतली. यासाठीचा फाेटाे त्यांनी व्हायरल केला. सध्या ५८ वर्षीय शास्त्री हे टीमसोबत अहमदाबाद येथे आहेत. या लसीकरणानंतर त्यांनी सर्व वैद्यकीय पथक आणि तज्ज्ञांचे खास आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...