आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय संघाने कसोटी मालिकेतील अखेरच्या निर्णायक लढतीत एकूण ७० धावांची आघाडी घेतली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांवर ढेपाळला. भारताने पहिल्या डावात १३ धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात भारताने २२३ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताने दिवसअखेर २ बाद ५७ धावा केल्या. लोकेश राहुल १० व मयंक अग्रवाल ७ धावांवर परतले. विराट कोहली (१४) व पुजारा (९) खेळत आहेत.
यजमान संघाने दुसऱ्या दिवशी आपल्या १ बाद १७ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने एडेन मार्करमला (८) त्रिफळाचीत केले. तो आत येणारा चेंडू समजू शकला नाही व बॅट उचलली. नाइट वॉचमन केशव महाराजने (२५) भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले. यजमान संघासाठी सर्वात मोठी ६७ धावांची भागीदारी चौथ्या गड्यासाठी पीटरसन (७२) व डुसेनने (२१) केली. ८ बाद १७९ धावांनंतर अखेरच्या २ जोडीने द. आफ्रिकेला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. भारताकडून बुमराहने सर्वाधिक ५ बळी घेतले. त्याने सातव्यांदा ५ बळी घेण्याची कामगिरी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.