आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर कर्णधार एल्गरने (नाबाद ९६) भारतीय गाेलंदाजांचा खरपुस समाचार घेत दक्षिण आफ्रिका संघाला गुरुवारी दुसऱ्या कसाेटी एकहाती विजय मिळवून दिला. आफ्रिका संघाने दुसऱ्या कसाेटीत ७ गड्यांनी टीम इंडियावर मात केली. विजयाचे २४० धावांचे लक्ष्य आफ्रिकेने चाैथ्या दिवशी तीन गड्यांच्या माेबदल्यात गाठले. यासह आफ्रिकेने या मैदानावर पहिल्यांदाच भारताचा पराभव झाला. विजयात मार्कराम (३१), पीटरसन (४०) व बावुमाचे (नाबाद २३) माेलाचे याेगदान ठरले. भारताकडून शमी, शार्दूल व अश्विने प्रत्येकी १ बळी घेतला. आफ्रिकेने तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक कसाेटीला ११ जानेवारीपासून सुरुवात हाेईल.
२९ वर्षांनंतर भारताचा मैदानावर पराभव : जाेहान्सबर्ग येथील न्यू वाँडरर्स है मैदान टीम इंडियासाठी लकी मानले जात हाेते. २९ वर्षांनंतर पहिल्यांदा टीमला या मैदानावर पराभवाला सामाेरे जावे लागले. भारताने १९९२ पासून या मैदानावर खेळत आहे. भारताने येथे ५ पैकी २ कसाेटीत जिंकल्या. तीन कसाेटी ड्रा झाल्या हाेत्या.
दरम्यान कर्णधार एल्गरने आपले आव्हान कायम ठेवताना न्यू वाँडरर्स मैदानावर भारताविरुद्ध पहिल्यादा विजयी पताका फडकवली. यासह त्याने संघासाठी निर्णायक असलेल्या कसाेटीत आफ्रिकेचा विजय निश्चित केला.
पावसाचा व्यत्यय; खेळाला उशिरा सुरुवात : गुरुवारी चाैथ्या दिवशी पहिल्या सत्रादरम्यान पावसाला सुरुवात झाली हाेती. त्यामुळे टी टाइमपर्यंत खेळ हाेऊ शकला नाही. मात्र, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.१५ वाजता खेळाला सुरुवात करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.