आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या चाैथ्या फेरीला मंगळवारपासून सुरुवात हाेत आहे. या स्पर्धेत सहभागी ३८ संघांचे सामने देशभरातील वेगवेगळ्या मैदानांवर रंगणार आहेत. यादरम्यान आैरंगाबादच्या अंकितच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ अम्बीच्या मैदानावर यजमान आसाम टीमविरुद्ध खेळणार आहे. तसेच विदर्भ संघाला इंदूरच्या मैदानावर यजमान मध्य प्रदेशच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. तसेच अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली फाॅर्मात असलेला मुंबई संघ आता तामिळनाडूविरुद्ध विजयासाठी सज्ज झाला आहे. याशिवाय साैराष्ट्र-दिल्ली आणि आंध्र प्रदेश-हैदराबाद यांच्यात हाेणारे सामनेही लक्षवेधी ठरणार आहेत. या संघांतील युवांची कामगिरी सर्वाेत्तम ठरली. त्यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मागे टाकले.
दहा फलंदाजांची सरासरी १०० पेक्षा अधिक; गाेलंदाजांची दमछाक यंदाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत युवा खेळाडू लक्षवेधी खेळी करत आहेत. यामध्ये खासकरून फलंदाज फाॅर्मात आहेत. यातूनच स्पर्धेच्या पहिल्या तीन फेऱ्यांदरम्यान १० फलंदाजांची सरासरी १०० पेक्षा अधिक नाेंद झाली आहे. यामध्ये प्लेट संघांतील दाेन फलंदाजांचा समावेश आहे. यासह या युवा फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनाही मागे टाकले. यात अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, साहापेक्षा अधिक सरस अशी कामगिरी हे युवा फलंदाज करत आहेत. राजस्थान संघाच्या दीपक हुडाने २ सामन्यांत १९१ च्या सरासरीने ३८२ धावा काढल्या आहेत. त्यामुळे स्पर्धेत गाेलंदाजांची चांगलीच दमछाक हाेताना दिसत आहे.
स्पर्धेतील टॉप-5 स्काेअरर फलंदाज डाव धावा सरासरी संघ ध्रुव शौरी 6 579 145 दिल्ली टी कोहली 5 510 102 मिजोरम प्रियांक पांचाळ 5 505 126 गुजरात साई सुदर्शन 6 420 70 तमिळनाडु तन्मय अग्रवाल 6 407 81 हैदराबाद
तिसऱ्या फेरीत वाढली निकालाची टक्केवारी; १५ संघ विजयी स्पर्धेची तिसरी फेरी अधिकच चर्चेत आली आहे. कारण, यादरम्यान सामन्यातील निकालाची टक्केवारी वेगाने वाढली आहे. सुरुवातीच्या दाेन फेऱ्यांच्या तुलनेत या फेरीमध्ये सर्वाधिक रिझल्ट लागले आहेत. पहिल्या फेरीत १९ पैकी १२, दुसऱ्या फेरीत १९ पैकी ११ सामन्यांचे निकाल लागले. तिसऱ्या फेरीत १९ पैकी १५ सामन्यांचे निकाल लागले आहेत. त्यामुळे ही संख्या युवांच्या सरस खेळीने वाढली आहे.
फिरकीपटू सरस, मात्र १६ वर्षीय वेगवान गाेलंदाज स्टार यंदाच्या सत्रातील स्पर्धेत फिरकीपटूंना आपला दबदबा कायम ठेवता आला. मात्र, डावात सर्वाेत्तम कामगिरी करण्यात वेगवान गाेलंदाज अधिक सरस ठरत आहेत. यात खासकरून १६ वर्षीय युवा वेगवान गाेलंदाजांची कामगिरी चर्चेत आली आहे. टाॅप-१० गाेलंदाजांमध्ये फक्त एकच मीडियम पेसर आहे. उर्वरित सगळेच फिरकीपटू आहेत. मेघालयच्या राजेश बिश्नाेई आणि केरळच्या जलज सक्सेनाने तीन सामन्यांत २६ बळी घेतले. सिक्कीमच्या पलजाेर या एकमेव वेगवान गाेलंदाजाने तीन सामन्यांत २१ बळी घेतले. मणिपूरच्या १६ वर्षीय पीजे सिंगने सिक्कीमविरुद्ध ९ बळी घेतले आहेेत.
यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत टॉप-5 गाेलंदाज (३ सामन्यांचे) गाेलंदाज भूमिका विकेट संघ राजेश बिश्नोई स्पिनर 26 मेघालय जलज सक्सेना स्पिनर 26 केरळ एजे मंडल स्पिनर 24 छत्तीसगड शम्स मुलानी स्पिनर 24 मुंबई आदित्य सरवटे स्पिनर 22 विदर्भ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.