आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण:महिला टी-20 चॅलेंजमधून भारतीय संघासाठी सापडल्या भविष्यातील खेळाडू; घेऊ शकतात मिताली-झुलनची जागा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिला टी-२० चॅलेंजचा २०२२ चे सत्र भारतीय संघाच्या भवितव्यासाठी मार्गक्रम तयार करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. अनुभवी मिताली व झुलन करिअरच्या अंतिम टप्प्यात आहेत. भारतीय संघाला तिन्ही प्रकारात पर्याय पाहिजे. भारतीय महिला संघाला पुढील काही महिन्यांत भरपूर क्रिकेट खेळायचे आहे. द्विपक्षीय मालिकेसाठी संघ जूनमध्ये श्रीलंकेचा दौरा करेल. जुलै-ऑगस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा होईल. महिला टी-२० चॅलेंजच्या माध्यमातून अनेक खेळाडूंनी भारतीय संघासाठी आपली दावेदारी ठोकली आहे. जाणून घ्या अशा खेळाडूंबद्दल...

जेमिमा रोड्रिग्ज- ६६ धावांची खेळी करत व्हेलॉसिटीविरुद्ध विजय मिळवून दिला
२१ वर्षीय जेमिमाने ट्रेलब्लेझर्ससाठी ४४ चेंडूंत ६६ धावांची खेळी करत संघाला व्हेलॉसिटीविरुद्ध विजय मिळवून दिला. ती उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे. ती म्हणाली होती, “कॉमनवेल्थ गेम्स आणि टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन मला माझ्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये राहायचे आहे.’

सिमरन बहादूर - तळाला मोठे फटके मारण्याच्या क्षमतेमुळे तिला व्हेलॉसिटी संघात स्थान
दिल्लीच्या अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंत फक्त १ वनडे व ४ टी-२० सामने खेळू शकली. तळाला खेळताना मोठे फटके मारण्याच्या क्षमतेमुळे तिला व्हेलॉसिटी संघात स्थान मिळवले. तिने अंतिम सामन्यात १० चेंडूत २० केल्या.

एस. मेघना - डावात तिच्या शॉटची रेंज दिसली, तिच्याकडे शानदार फुटवर्कही आहे
ट्रेलब्लेझर्सची सलामीवीर शबिनेनी मेघनाने व्हेलॉसिटीविरुद्ध ४७ चेंडूंत ७३ धावा केल्या. तिचा स्ट्राइक रेट १५५.३१ होता. या खेळीने केवळ त्याच्या शॉट्सची रेंज दाखवली नाही, तर अप्रतिम फुटवर्कही दाखवले. ती फलंदाजी करताना योग्य वेळी क्रीझच्या डेप्थचा वापर करते.

हरलीन देओल - फलंदाजाचा क्रम निश्चित नाही, कुठल्याही क्रमावर स्वत:ला सिद्ध केले
देओलने सुपरनोव्हासच्या सलामीच्या सामन्यात १९ चेंडूंत ३५ धावा करून संघाला विजयी केले. तिने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत २ झेलही घेतले. तिचा फलंदाजी क्रम निश्चित नाही. कोणत्याही क्रमांकावर खेळत स्वत:ला सिद्ध केले.

किरण नवगिरे - २५ चेंडूंत अर्धशतक केले होते, स्पर्धेतील वेगवान अर्धशतक ठरले
प्रियाने दिल्लीच्या या फलंदाजाने फेब्रुवारी २०१९ मध्ये टी-२० पदार्पण केले. परंतु ती काही विशेष करू शकली नाही. टी-२० चॅलेंजमध्ये तिच्या खेळात बरीच सुधारणा दिसली. तिच्यात चौकार मारण्याची क्षमता असून स्ट्राइक रोटेटची विशेषता आहे.

बातम्या आणखी आहेत...