आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुमार डावपेच आणि काेहलीच्या अपयशी नेतृत्वामुळेच टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात वनडे मालिकेत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. यातून टीम इंडियाचा मालिका पराभव झाला, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करताना माजी क्रिकेटपटू गाैतम गंभीरने काेहलीच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले. काेेहलीपेक्षाही राेहित शर्मा हा सर्वाेत्कृष्ट कर्णधार असल्याचेही गंभीरने या वेळी सांगितले. आॅस्ट्रेलिया दाैऱ्यातील सुरू असलेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाला सलग दाेन सामन्यांत पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे भारताचा संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पिछाडीवर आहे. आता मालिकेतील शेवट गाेड करण्यासाठी टीम इंडिया उद्या बुधवारी कॅनबेराच्या मैदानावर उतरणार आहे. या वनडे सामन्यासाठी संघात बदल करावा. यासाठी गाेलंदाजांमध्ये वाॅशिंग्टन सुंदर किंवा शिवम दुबेला संधी देण्यात यावी, असा सल्लाही गंभीरने या वेळी दिला.
दाेन्ही सामन्यात गाेलंदाजीचे डावपेच संशयास्पद :
विराट काेहलीने दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराहकडे फक्त दाेन आेव्हरचा सुरुवातीचा मारा दिला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकीचा हाेता. अशा प्रकारचे काही निर्णय हे टीम इंडियाच्या पराभवाचे कारण ठरले आहेत. यातूनच यजमान आॅस्ट्रेलिया संघाला आपल्या घरच्या मैदानावर भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावसंख्येच्या आपल्याच विक्रमात सलग दाेन वेळा माेठी प्रगती साधता आली. यातूनच आता आॅस्ट्रेलिया टीमच्या नावे भारताविरुद्ध सर्वाधिक ३८९ धावसंख्येची नाेंद झाली आहे. हाच स्काेअर आॅस्ट्रेलियन टीमने सिडनीच्या मैदानावर दुसऱ्या वनडे सामनादरम्यान केला हाेता. हेच खडतर लक्ष्य गाठण्यात भारताचा संघ दाेन वेळा अपयशी ठरला.
नेतृत्व हे समजण्यापलीकडचे
विराट काेहलीचे आॅस्ट्रेलिया दाैऱ्यातील नेतृत्व हे माझ्या तरी समजण्यापलीकडचे आहे. कारण त्याने घेतलेले सर्वच निर्णय टीमच्या अंगलट आले आहेत. यजमान आॅस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला राेखण्यासाठी डावपेचात बदल करण्याची गरज हाेती. मात्र, त्याने तसा काेणत्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे ही लाइनअप सलग दुसऱ्या वनडेतही भारतासाठी महागात पडली, असेही गंभीरने सांगितले. दुसरीकडे भारतीय संघातील फलंदाजीची फळी सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे माेठ्या टार्गेटचा पाठलाग करताना टीमची दाणादाण उडत गेली. यातून सलग दाेन्ही सामन्यात टीमला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय मालिकाही गमावावी लागली.
युवांना संधी अधिक फायदेशीर : आता तिसरा पराभव टाळण्यासाठी युवा गाेलंदाजांना संधी देणे भारतीय संघासाठी अधिक फायदेशीर ठरेल, असा सल्लाही गाैतम गंभीरने दिला. गाेलंदाजीसाठी शिवम दुबे व वाॅशिंग्टन सुंदर यांची नावेही या माजी सलामीवीराने सुचवली आहे. हे बदल संघाला तारणारे ठरतील, असे त्याचे म्हणणे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.