आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकतारमध्ये लीजेंड लीग क्रिकेट मास्टर्स स्पर्धा सुरू झाली आहे. शुक्रवारी (10 मार्च) पहिला सामना इंडियन महाराज आणि आशिया लायन्स यांच्यात झाला. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी या स्पर्धेत आशिया संघाचे नेतृत्व करत आहे. तर गौतम गंभीर भारतीय संघाचा कर्णधार आहे.
पहिल्या सामन्यातच इंडियान महाराज संघाला 9 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. सामन्यात 50 चेंडूत 73 धावा करणाऱ्या आशिया संघाच्या मिसबाह उल हकची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. तर भारतीय संघाकडून गौतम गंभीरने 39 चेंडूत 54 धावांची खेळी केली.
सोशल मीडियावर चाहत्यांनी लुटला आनंद
या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी अशी एक घटना पाहायला मिळाली, जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. नाणेफेकीदरम्यान आफ्रिदीने गौतम गंभीरशी हस्तांदोलन केले. त्यावेळी गौतमचा चेहरा खूपच गंभीर दिसत होता. यावेळी गंभीर मात्र आफ्रिदीकडे पूर्णपणे दुलर्क्ष करताना दिसला
त्याचा फोटो-व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनीही खूप एन्जॉय केले. दोन बेस्ट फ्रेंड्सची भेट होत असल्याचे एका युजरने व्यंगात्मकपणे म्हटले आहे. तर दुसरा चाहता म्हणाला - येथे भांडण होऊ नये. या सामन्यातही अनेक घटना घडल्या, जेव्हा गंभीर आणि आफ्रिदीमध्ये तणावाचे वातावरण होते.
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही दोघांमध्ये अनेकदा ताणतणाव दिसला
आपल्याला माहित असेलच की जेव्हा गंभीर आणि आफ्रिदी इंटरनॅशनल मॅच खेळायचा आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना व्हायचा, तेव्हा या दोन खेळाडूंमध्ये खूप टशन असयचे. कधी कधी खूप कठीण परिस्थिती निर्माण व्हायची. एकदा गंभीर आणि आफ्रिदीमध्ये बाचाबाची झाली. पण सहकारी खेळाडू आणि पंच यांनी मध्ये पडून प्रकरण शांत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.