आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 विश्वचषकावर मोठा निर्णय:भारत सरकार देणार पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा, अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ​​​​​​​

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीसीसीआयने टी -20 वर्ल्ड कपसाठी 9 स्थळांची तयारी केली आहे

​​​​​​आयसीसी टी-20 विश्वचषकाच आयोजन यावर्षी भारतात होणार आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, याचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाला आणि तेथील माध्यमांना देशात येण्यास अडचणी न व्हावी याकरीता व्हिसा देण्यास सहमती दर्शवली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी एका बैठकीमध्ये ॲपेक्स कॉन्सिल याची माहिती दिली. मंडळाचे सचिव शहा यांनी स्वत:देखील ॲपेक्स कॉन्सिल याची माहिती दिल्याचे सांगितले जात आहे.

चाहत्यांना व्हिसा देण्याबाबत अद्याप निर्णय नाही
बीबीसीआयच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या चाहत्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले की, टी-20 विश्वचषक हे आयसीसीचा महत्वाचा कार्यक्रम असल्याने याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे त्यांनी सांगितले.

पीसीबीने दिले होते अल्टीमेटम
व्हिसाबाबत पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांनी बीसीसीआयला 31 मार्चपूर्वी आपले भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या बैठकीमध्ये आयसीसीने हा मुद्दा एका महिन्यात सोडविण्यात येईल असे सांगितले होते.

टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी 9 स्थळांची तयारी

बीसीसीआयने टी -20 वर्ल्ड कपसाठी 9 स्थळांची तयारी केली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, धर्मशाला, कोलकाता आणि लखनऊ येथील स्टेडियमचा समावेश आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर अंतिम सामना होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...