आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:भारतामुळे कसाेटीला चालना; या संघाने खेळणे साेडून दिल्यास हा फाॅरमॅट नष्ट!

चंदिगडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताचे माजी काेच चॅपेल यांची कसाेटीबाबत चिंता

भारतीय संघामुळेच कसाेटीला चालना मिळाली. मात्र, या टीमने कसाेटी खेळणे बंद केले तर, माेठे नुकसान हाेईल. त्यामुळे क्रिकेटचा हा फाॅरमॅटच नष्ट हाेईल, अशी  भीती भारताचे माजी काेच आणि आॅस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल यांनी व्यक्त केली. याशिवाय  माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनी हा जगातील सर्वाेत्तम असा पाॅवरफुल फलंदाज आहे. याशिवाय जगातील सर्वाेत्तम फिनिशरची ख्याती त्याच्या नावे आहे.  त्यामुळे हा जगातील दर्जेदार क्रिकेटपटू आहे, अशा  शब्दांत माहीवर त्यांनी काैतुकाचा वर्षाव केला. 

धाेनीने केली गुणवत्ता आत्मसात:

क्रिकेटच्या विश्वात आपली वेगळी आेळख निर्माण करण्यासाठी लागणारी सर्वाेत्तम गुणवत्ता धाेनीने आत्मसात केली आहे. दर्जेदार कामगिरीशिवाय त्याने कुशल नेतृत्वातही बाजी मारली आहे. त्यामुळेच त्याला या विश्वातील सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते. धाेनीचे क्रिकेटमधील सध्याचे  अस्तित्व हे भारतीय संघाला मिळालेली माेठी भेट असल्याचेही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...