आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) नवा बॉस मिळाला आहे. न्यूझीलंडचे क्रिकेट प्रशासक आणि वकील ग्रेगर बार्कले पुन्हा एकदा ICC चे अध्यक्ष बनले आहेत. शनिवारी त्यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांची सलग दुसऱ्यांदा या पदावर निवड झाली आहे. त्याचबरोबर BCCI चे सचिव जय शाह यांना आर्थिक समितीचे प्रमुख बनवण्यात आले आहे.
तवेंगवा मुकुहलानी यांचे नाव मागे घेतल्याने या पदासाठी निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. पुढील दोन वर्षे ते या पदावर राहतील. बार्कलेने दुसरी टर्म न मागता पायउतार झाल्यास ICC ला नवीन अध्यक्ष मिळेल, असा विश्वास होता. पण, बार्कले यांनी त्यांची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला होता
ऑकलंडचे व्यावसायिक वकील बार्कले नोव्हेंबर 2020 मध्ये प्रथमच ICC चे अध्यक्ष बनले. ते न्यूझीलंड क्रिकेटचे अध्यक्षही होते. त्यांना 2015 च्या वनडे विश्वचषकाचे संचालक देखील बनवण्यात आले होते.
गांगुलीच्या नावाची चर्चा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचेही नाव ICC अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते, मात्र BCCI च्या प्रमुखपदावरून पायउतार झाल्यानंतर या माजी भारतीय क्रिकेटपटूने अर्ज; भरला नाही.
BCCI निवडणुकीपूर्वी सौरव ICC चा अध्यक्ष होऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात होती. आतापर्यंत चार भारतीय प्रशासकांनी हे पद भूषवले आहे. यामध्ये जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांचा समावेश आहे.
आता जाणून घ्या ICC अध्यक्षाची निवड कशी होते?
ICC चे 16 बोर्ड सदस्य मिळून त्यांचा अध्यक्ष निवडतात. त्यात 12 कसोटी खेळणारे देश आहेत. प्रथम ते कोणते देश आहेत ते जाणून घेऊया?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.