आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनी WPL मधून बाहेर पडली आहे. तिच्या जागी स्नेह राणा संघाचे नेतृत्व करत आहे.
फ्रँचायझीने स्नेह राणाच्या जागी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू एश्ले गार्डनरची नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच मुनीच्या जागी लॉरा वोल्वार्डचा संघात समावेश करण्यात आला आहे. फ्रँचायझीने गुरुवारी प्रसारमाध्यमांमध्ये ही माहिती दिली.
फलंदाजी करताना गुडघा फिरला
पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना दुखापतग्रस्त मुनी रिटायर हर्ट झाली होती. एक झेल घेण्याच्या प्रयत्नात तिच्या पायाचा गुडघा फिरला. त्यानंतर संघाची कमान उपकर्णधार स्नेह राणाकडे होती.
RCB विरूद्ध मिळवला पहिला विजय
सलगच्या दाेन पराभवांनंंतर स्नेह राणाच्या नेतृत्वाखाली गुजरात महिला संघाने बुधवारी स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात विजय साजरा केला. गुजरात संघाने सामन्यात स्मृती मानधनाच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा 11 धावांनी पराभव केला. यातून गुजरातने पहिला विजय नाेंदवला. दुसरीकडे बंगळुरू संघाला स्पर्धेत सलग तिसऱ्या लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.
नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 201 धावा काढता आल्या. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाला निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या 190 धावांपर्यंत मजल मारता आली. संघाच्या विजयासाठी साेफिई डेव्हिनने एकाकी झुंज देताना 66 धावांची खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांच्या सुमार खेळीने टीमला पराभवाचा सामना करावा लागला.
MI विरूद्ध संघाचा 143 धावांनी झाला होता पराभव
साखळीतील पहिल्या सामन्यात गुजरात संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 207 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 64 धावांत ऑलआऊट झाला. त्यांना 143 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर मुनीने दुसरा कोणताही सामना खेळला नाही. जायंट्सच्या सामन्यांदरम्यान ती तिच्या सहकाऱ्यांसोबत दिसत असते.
गुजरातने 2 कोटींना घेतले विकत
बेथ मूनीला WPL खेळाडूंच्या लिलावात गुजरात फ्रँचायझीने 2 कोटी रुपयांना विकत घेतले. तिच्यासोबत तिच्या देशातील म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळाडू एशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम आणि एनाबेल सदरलँड यांनी चांगली किंमत मिळाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.