आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यजमान ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिका तिसरी कसाेटी:ख्वाजा, लबुशेनची अर्धशतके; अंधुक प्रकाशाने खेळाला ब्रेक

सिडनीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मालिका विजयाने फाॅर्मात असलेल्या यजमान ऑस्ट्रेलिया संघाने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात दमदार सुरुवात केली. संघाने पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर २ बाद १४७ धावा काढल्या. यादरम्यान उस्मान ख्वाजा (५४) आणि मार्नस लबुशेनची (७९) अर्धशतकी खेळी लक्षवेधी ठरली. दरम्यान, अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाच्या खेळाला फटका बसला. यातून पहिल्या दिवशी फक्त ४७ षटकांचाच खेळ हाेऊ शकला. अंधुक प्रकाशामुळे पंचांनी खेळ लवकर थांबवण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान पावसाचेही आगमन झाले हाेते.

नाणेफेक जिंकून यजमान ऑस्ट्रेलिया संघाने घरच्या मैदानावरील तिसऱ्या कसाेटीत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, गत सामन्यातील द्विशतकवीर डेव्हिड वाॅर्नर (१०) पहिल्या डावात फ्लाॅप ठरला.

बातम्या आणखी आहेत...