आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिजेंड्स लीग:हरभजन, इरफानच्या नेतृत्वात लिजेंड्स लीगमध्ये उतरणार संघ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघाचा स्पिनर हरभजनसिंग आणि इरफान पठाण यांच्या कॅप्टनन्सीमध्ये लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये संघ खेळणार आहे. हरभजन मणिपाल टायर्गसचा कर्णधार असेल, तर इरफान भिलवाडा किंगचे नेतृत्व करेल. लीगची सुरुवात १६ सप्टेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डनमध्ये होईल. हरभजन म्हणाला की, अनेक वर्षांपर्यंत जगभरातील आघाडीच्या क्रिकेटर्ससोबत खेळल्यानंतर मला खेळातील बारकावे कळाले. यामुळे मला चांगला क्रिकेटर बनण्यास मदत मिळाली. संघाचा कॅप्टन म्हणून मला संधी मिळाली नाही. परंतु येथे कर्णधारपदाबाबत मी उत्साहित आहे.

बातम्या आणखी आहेत...