आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्डकप:भारताला मेहनतीने, पाकला नशिबाने सेमीफायनलचे तिकीट, भारताची  झिम्बाब्वे संघावर 71 धावांनी मात

मेलबर्न/अॅडिलेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय संघ ब गटातून उपांत्य फेरीत; आफ्रिका संघाच्या पराभवाने पाकला संधी

सामनावीर सूर्यकुमार यादव (नाबाद ६१), लाेकेश राहुल (५१), अश्विन (३/२२), हार्दिक (२/१६) यांनी सर्वाेत्तम खेळीतून टीम इंडियाचा टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित केला. राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रविवारी ब गटातील आपल्या शेवटच्या सामन्यात क्रेग इरर्विनच्या झिम्बाब्वे टीमला धूळ चारली. भारताने १७.२ षटकांत ७१ धावांनी सामना जिंकला. यासह टीम इंडियाने प्रचंड मेहनतीतून उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ गड्यांच्या माेबदल्यात झिम्बाब्वेसमाेर विजयासाठी १८७ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात झिम्बाब्वे संघाला १७.२ षटकांत ११५ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला. संघाकडून सिकंदरने ३४ आणि बर्लने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. भारताचा उपांत्य सामना गुरुवारी इंग्लंड संघाविरुद्ध हाेणार आहे.

राेहितचे नेतृत्वाचे अर्धशतक : राेहित शर्माने कर्णधाराच्या भूमिकेत टीम इंडियाकडून ५० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने यंदाच्या सत्रामध्ये २१ वा आणि ओव्हरआॅल टी-२० मध्ये ३९ वा विजय साजरा केला. तसेच राेहित शर्मा हा टीम इंडियाला वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठून देणारा दुसरा कर्णधार ठरला. यापूर्वी धाेनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २०१६ मध्ये उपांत्य फेरी गाठली हाेती. त्यानंतर आता राेहितने हे यश संपादन केले आहे.

धक्कादायक निकालाने कलाटणी : दुसरीकडे हाॅलंड संघाने गटातील शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सनसनाटी विजय संपादन केला. त्यामुळे आफ्रिका संघाचे उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले. यादरम्यान पाकिस्तान संघाला अंतिम चारमधील प्रवेशाची संधी मिळाली. पाकिस्तान संघाने सामन्यात बांगलादेशवर पाच गड्यांनी मात केली. त्यामुळे आफ्रिकेच्या पराभवाने पाकला नशिबाने उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले. या धक्कादायक निकालाने स्पर्धेतील सर्वच अंदाज, तर्कवितर्कांना माेठी कलाटणी बसली.

झिम्बाब्वेची सुमार फलंदाजी; अश्विनचे तीन बळी खडतर लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघाची माेठी दमछाक झाली. टीमला सुमार फलंदाजीने पराभवाला सामाेरे जावे लागले. टीमचा सलामीवीर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. भुवनेश्वरने सलामीवीर वेसलीला काेहलीकरवी झेलबाद केले. त्यानंतर पुढच्या षटकात अर्शदीपने चकाबवाला शून्यावर बाद केले. त्यामुळे टीमची पडझड सुरू झाली. यादरम्यान सिकंदर आणि बर्लने संघाचा डाव सावरला. त्यांनी माेठी खेळी करण्याचा प्रयत्न करत धावसंख्येला गती दिली. मात्र, भारतीय गाेलंदाजांनी याला ब्रेक लावला. अश्विनने सर्वाधिक ३ व हार्दिकने दाेन बळी घेतले.

सूर्यकुमार वर्ल्डकपमध्ये भारताचा तिसरा वेगवान अर्धशतकवीर वर्ष फलंदाज चेंडू प्रतिस्पर्धी 2007 युवराज 12 इंग्लंड 2007 युवराज 20 ऑस्ट्रेलिया 2021 केएल राहुल 18 स्काॅटलंड 2022 सूर्यकुमार 23 झिम्बाब्वे सूर्यकुमार यंदाच्या सत्रात ठरला हायस्ट स्काेअरर फलंदाज धावा सूर्यकुमार यादव 1026 मोहंमद रिजवान 924 सिकंदर रजा 735 विराट कोहली 731 पथुम निसंका 713

बातम्या आणखी आहेत...