आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गूड न्यूज:क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमण, गर्लफ्रेंड नताशाने दिला गोंडस बाळाला जन्म, हार्दिक पांड्याने फोटो शेअर करत दिली माहिती

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट टीमचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. हार्दिक आणि नताशा या जोडीला आज पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. आपल्याला मुलगा झाल्याची बातमी हार्दिकने आपल्या फेसबूक आणि इंस्टाग्राम अकाउंटवरुन चाहत्यांना दिली आहे. त्याने लहान बाळाचा फोटो शेअर केला आहे. मात्र यामध्ये त्याने बाळाचा चेहरा दाखवलेला नाही.

हार्दिक-नताशाने गोड बातमी दिली तेव्हापासूनच हे दोघेही खूप चर्चेत होते. या दोघांनी लग्नाबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. हार्दिकने नताशा गरोदर असल्याचे फोटो शेअर केले होते. यासोबतच घरातील धार्मिक विधीचाही फोटो त्याने शेअर केला होता. सोशल मीडियावर तो प्रचंड चर्चेत होता.

View this post on Instagram

We are blessed with our baby boy ❤️🙏🏾

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on Jul 30, 2020 at 3:03am PDT