आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक बनला कॅप्टन:आयपीएलच्या अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पंड्याला दिली कर्णधार पदाची जबाबदारी, मुंबई इंडियन्सने केले नव्हते रिटेन

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिटनेसच्या समस्येला तोंड देणाऱ्या हार्दिक पंड्यासाठी चांगले वृत्त आले आहे. अहमदाबाद टीमने IPL 2022 साठी हार्दिकला कर्णधार पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, स्टार क्रिकेटर हार्दिकला मुंबई इंडियन्सने पुढच्या सीझनसाठी रिटेन केलेले नाही.

बॉलिंग करत नव्हता पंड्या

2019 पासूनच हार्दिक फिटनेसच्या समस्येला तोंड देत आहे. त्याने पाठीची सर्जरी सुद्धा केली आहे. तरीही फिटनेस नसल्यामुळे तो गोलंदाजीत फेल ठरत होता. IPL च्या गेल्या सीझनमध्ये त्याने बॉलिंग केलीच नव्हती. टी-20 वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये सुद्धा तो बॉलिंग करू शकला नाही. यामुळेच एकीकडे त्याला भारतीय क्रिकेट टीममधून आपले स्थान गमवावे लागले. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने सुद्धा रिटेन करण्यास नकार दिला.

लोकल फॅक्टरमुळे बनला कर्णधार

एक्सपर्टच्या मते, पंड्या गुजरातचा असल्याने लोकांमध्ये आपल्या टीमविषयी जिव्हाळा निर्माण करण्यासाठी, टीमची फॅन फॉलोइंग वाढवण्यासाठी अहमदाबाद फ्रँचायझीने हा निर्णय घेतला. अशात टीममध्ये कॅप्टन झाल्यानंतर हार्दिकने गोलंदाजी नाही केली तरीही त्याच्या प्रसिद्धीचा टीमला फायदा होऊ शकतो.

याच टीममध्ये राशिद खान

हार्दिक पंड्यासह अहमदाबादच्या या आयपीएल टीममध्ये अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान सुद्धा सामिल झाल्याचे वृत्त आहे. आयपीएलच्या यापूर्वीच्या सीझनमध्ये राशिद हैदराबाद संघात होता. यावेळी तो स्वतः हैदराबाद संघातून बाहेर पडला होता.

बातम्या आणखी आहेत...