आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया कपमध्ये गाेलंदाज अपयशी:हार्दिकचा तिसऱ्या पेसरचा दावा फ्लाॅप; फिनिशरसाठी दिनेश कार्तिक याेग्य पर्याय

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत यूएईमधील आशिया कप क्रिकेट स्पर्धेदरम्यान सर्वात मजबूत संघ मानला जात हाेता. यासाठी निवड समितीने संतुलित भारतीय संघ जाहीर केला हाेता. त्यामुळे टीम इंडियाचा आशिया कप जिंकण्याचा दावा मजबूत हाेता. मात्र, गाेलंदाजांच्या सुमार कामगिरीने टीम इंडियाच्या फायनलमधील प्रवेशाच्या आशेवर पाणी फेरले गेले. या स्पर्धेदरम्यानच्या सर्वच सामन्यांत भारतीय संघाला नाणेफेकीतही अपयश आले. दुबईमध्ये नाणेफेकीचा काैलही महत्त्वाचा मानला जाताे. नाणेफेकीतील अपयशाने भारतीय संघाला सामन्यागणिक प्रथम फलंदाजी करावी लागली. हार्दिक पंड्याची तिसऱ्या पेसरच्या भूमिकेसाठीची दावेदारी सपशेल अपयशी ठरली. मात्र, यादम्यान दिनेश कार्तिकने फिनिशरसाठीचा आपला दावाही मजबूत केला आहे.

आवेशच्या अनुपस्थितीमुळे भासली तिसऱ्या गाेलंदाजाची उणीव
हार्दिकने यंंदा वेगवान गाेलंदाजीसह स्पर्धेत दमदार सुरुवात केली हाेती. सलामी सामन्यात त्याच्या शाॅर्ट-बाॅल ट्रिकमुळे पाकिस्तानचे फलंदाज अडचणीत सापडले हाेते. त्याने दाेन सामन्यांत ८ षटकांदरम्यान ७९ धावा देताना एक विकेट घेतली. मात्र, याच निराशाजनक खेळीचा टीमला माेठा फटका बसला. यादरम्यान टीम इंडियाला आवेश खानची उणीव भासली. कारण, आजारपणामुळे त्याला सहभागी हाेता आले नाही. त्यामुळे हार्दिकडून माेठी आशा हाेती त्याला समाधानकारक खेळी करता आली नाही. आता भारतीय संघाला जसप्रीत बुमराह व हर्षल पटेलकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान सर्वाेत्तम कामगिरीची आशा आहे.

दीपक हुडाला संधी नाही; कर्णधार राेहितचे दुर्लक्ष
दीपक हुडाने यंदाच्या सत्रातील आयपीएलदरम्यान लखनऊ संघाकडून सर्वाेत्तम गाेलंदाजी केली. त्यामुळे त्याला आशिया कपमध्ये जडेजाच्या अनुपस्थितीत फिनिशर आणि सहाव्या गाेलंदाजाच्या भूमिकेसाठी दावेदार मानले जात हाेते. त्याला अफगाणिस्तान संघाविरुद्ध संधी मिळाली. त्याने एक षटक गाेलंदाजी केली. यादरम्यान दिनेश कार्तिकला विश्रांती देण्याचा निर्णय चुकीचा हाेता. त्याला फिनिशरच्या भूमिकेत संघात स्थान देण्यात आले.

आघाडी फळीच्या कामगिरीचा दर्जा उंचावला; काेहली सरस
विराट काेहलीने आपला शतकाचा दुष्काळ दूर केला. तब्बल दाेन वर्षे आणि ९ महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शतक साजरे केले. त्याने अफगाणिस्तान संघाविरुद्ध नाबाद १२२ धावा काढल्या. यासह त्याने टी-२० फाॅरमॅटमध्ये पहिल्या शतकाची नाेंद केली. तसेच राेहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध व लाेकेेश राहुलने अफगाणिस्तान संघाविरुद्ध वैयक्तिक अर्धशतके साजरी केली. त्यामुळे आघाडीच्या फळीने कामगिरीचा दर्जा उंचावला. राहुल व काेहलीने अफगाणिस्तान संघाविरुद्ध शतकी भागीदारीची सलामी दिली. राेहित व सूर्यकुमारची कामगिरीही सर्वाेत्तम ठरली. आघाडीच्या फळीने दमदार सुरुवात करून दिल्यानंतर मधळी फळीही हाच कित्ता गिरवते, याचाच प्रत्यय टीमने आणून दिला.

युजवेंद्र चहलचे वर्ल्डकप तिकीट निश्चित, रवी बिश्नाेई-अश्विनसाठी वेट अँड वाॅच; निवड समिती घेणार निर्णय
युजवेंद्र चहलसाठी यंदाची आशिया कप क्रिकेट स्पर्धा खास राहिली नाही. त्याला लक्षवेधी कामगिरी करता आली नाही. मात्र, तरीही त्याचा ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकासाठीचा भारतीय संघातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. तसेच जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलला संधी मिळू शकेल. तसेच निवड समिती आर. अश्विन आणि रवी बिश्नाेईच्या बाबतीत निर्णय घेणार आहे. त्यामुळे या दाेघांसाठी हा प्रवेश वेट अँड वाॅच आहे. या दाेघांची कामगिरी सरस आहे. कारण, याच्या प्रवेशाचा निर्णय हा निवड समिती घेणार आहे. यासाठी त्यांना दर्जेदार खेळी करावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...