आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:हार्दिकचा आगामी आॅस्ट्रेलिया दाैऱ्यातील सहभाग ठरेल टीम इंडियासाठी फायदेशीर - इयान चॅपल

मेलबर्न9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आॅस्ट्रेलिया दाैऱ्यात भारतीय संघ खेळणार कसाेटी मालिका

आगामी आॅस्ट्रेलिया दाैऱ्यामध्ये हार्दिक पांड्याचा सहभाग हा भारतीय संघासाठी अधिकच फायदेशीर ठरेल. यातून टीम इंंडियाला कसाेटी मालिकेत घवघवीत यश संपादन करता येईल, असा सल्ला आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांनी दिला. भारतीय संघ सत्राच्या शेवटी आॅस्ट्रेलियाचा दाैरा करणार आहे. या दाैऱ्यात आॅस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चार कसाेटी सामन्यांची मालिका हाेणार आहे. या मालिकेत हार्दिकला खेळवण्यात यावे, असे चॅपल म्हणाले. मात्र, सध्या भारताचा युवा गाेलंदाज हार्दिक हा पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे विश्रांती घेत आहे. 

मात्र,आपण कमबॅकसाठी उत्सुक असल्याचे त्याने सांगितले. ‘हार्दिककडे या मालिकेदरम्यान आपल्या षटकांची संख्या हळूहळू वाढण्याची माेठी संधी आहे. ताे या मालिकेत भारताकडून तिसऱ्या वेगवान गाेलंदाजाची भूमिका बजावण्यात यशस्वी ठरेल. याचा निश्चित असा माेठा फायदा पाहुण्या भारतीय संघाला हाेईल, असेही चॅपल यांनी सांगितले.

लाळेपासून काेणताही धाेका नाही

बायाे सिक्याेरसाेबत हाेणाऱ्या सामन्यादरम्यान लाळेचा केलेला वापर हा काेणत्याही प्रकारे धाेकादायक ठरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गाेलंदाज शाॅन पाेलकने दिली. १४ दिवस क्वाॅरंटाइनमध्ये राहिलेल्या खेळाडूपासून दाेन आठवड्यांपर्यंत काेणताही धाेका राहत नाही, असे वैद्यकीय तज्ञ सांगतात. त्यामुळे अशा वेळी गाेलंदाजांकडून वापरल्या जाणाऱ्या लाळेची भीती बाळगणे चुकीचे ठरेल, असेही ताे म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...