आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर कर्णधार हरमनप्रीत काैर (६५) आणि साईका इशाकीने (४/११) आपल्या सर्वाेत्तम कामगिरीच्या बळावर यजमान मुंबई इंडियन्स संघाला शनिवारी पहिल्या सत्रातील महिला प्रीमियर लीगमध्ये पहिला विजयी संघाचा बहुमान मिळवून दिला. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मुंबई महिला संघाने सलामीच्या लढतीत बेथ मुनीच्या गुजरात जायंट्स टीमवर माेठा विजय संपादन केला. मुंबई इंडियन्स संघाने घरच्या मैदानावर १५.१ षटकांत १४३ धावांनी विजयी सलामी दिली. यासह मुंबई संघाला आपल्या किताबाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करता आली. अवघ्या ३० चेंडूंमध्ये ६५ धावांची तुफानी खेळी करणारी हरमनप्रीत सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
यजमान मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये ५ गड्यांच्या माेबदल्यामध्ये गुजरात टीमसमाेर विजयासाठी २०८ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात गुजरात संघाला अवघ्या ६४ धावांवर गाशा गुंडाळावा लागला. संघाच्या चार महिला फलंदाजांना सलामी सामन्यात भाेपळाही फाेडता आला नाही.
डिएट्रा डाेटिन बाहेर; गार्थला संधी गुजरात जायंट्स संघाला महिला प्रीमियर लीगच्या सलामी सामन्यापूर्वीच माेठा धक्का बसला आहे. आजारी असल्यामुळे डिएट्रा डाेटिन लीगमधून बाहेर झाली. तिच्या जागी संघामध्ये ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर किम गार्थची निवड करण्यात आली.
रंगारंग कार्यक्रमाने लीगचे उद्घाटन पहिल्याच सत्रातील महिला प्रीमियर लीगला माेठ्या जल्लाेषात शनिवारी सुरुवात झाली. सिनेअभिनेत्रींच्या खास नृत्याविष्काराने या लीगचा उद्घाटन साेहळा अधिकच लक्षवेधी ठरला. या उद्घाटन साेहळ्यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष राॅजर बिन्नी, सचिव जय शहा यांच्यासह पाचही फ्रँचायझींचे मालक उपस्थित हाेते. यादरम्यान गुजरात व मुंबई सामन्याने सुरुवात झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.