आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेश संघाने गुरुवारी इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत शेष भारत टीमविरुद्ध दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ३ बाद ११२ धावा काढल्या. अद्याप ३७२ धावांनी पिछाडीवर असलेल्या मध्य प्रदेश संघाचा हर्ष गवळी (४७) आणि यश दुबे (५३) मैदानावर आहेत. त्यांच्याकडून संघाला माेठ्या खेळीची आहे. शेष भारताने पहिल्या डावात ४८४ धावांचा डाेंगर उभा केला. मध्य प्रदेशकडून आवेशने ४ बळी घेतले. प्रत्युत्तरात मध्य प्रदेश संघाची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर कर्णधार हिमांशू (१), अरहम (०) व शुभम (०) झटबाद झाले. त्यामुळे मध्य प्रदेश संघ अडचणीत सापडला. मात्र, हर्ष आणि यश दुबेने डाव सावरण्यासाठी कंबर कसली. या दाेघांनी चाैथ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी रचली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.