आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:बीसीसीआयचे हंगामी सीईओ बनले हेमांग अमीन, माजी सीईओ राहुल जोहरींचा राजीनामा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंडळात हेमांग अमीनचे योगदान राहुल जोहरीपेक्षा अधिक

बीसीसीआयने हेमांग अमीनला हंगामी सीईओ बनवले आहे. मंडळाने गेल्या आठवड्यात माजी सीईओ राहुल जोहरींचा राजीनामा स्वीकारला होता. हेमांग सध्या आयपीएलचे सीओओ आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, हे एक चांगले पाऊल आहे, कारण अमीन गेल्या काही वर्षांत मंडळातील सर्वात मेहनती व्यक्तींपैकी एकजण आहे. अधिकाऱ्याने म्हटले, ‘पदासाठी ते योग्य व्यक्ती आहेत. मंडळात त्यांचे योगदान राहुल जोहरीपेक्षा अधिक आहे. त्यांनी महत्त्वाचे काम बीसीसीआयच्या व्यावसायिक करारावर केले.’ मंडळाचे सचिव जय शहाने सर्व राज्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये हेमांग यांच्या नियुक्तीची माहिती दिली. १७ जुलै रोजी अपेक्स काैन्सिलच्या बैठकीत नव्या सीईओच्या नियुक्ती बाबत नियम जाहीर करण्यात येऊ शकतात.

हेमांग सोबत काम करत असलेल्या एका माजी पदाधिकाऱ्याने म्हटले की, ते इमानदार कार्यकर्ता आहेत, ते मनाने मंडळाच्या हिताचे काम करतात. त्यांनी म्हटले, ‘सक्षम व इमानदार असल्यामुळे ते मंडळाचे सर्वाधिक हित पाहतील. ते आपला ई मेल देखील लिहतात.’ जोहरीचा राजीनामा गुरुवारी स्वीकारण्यात आला. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.