आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिट अ‍ॅंड रन:कारखाली चिरडून वृद्धाचा जागीच मृत्यू, श्रीलंकन क्रिकेटपटूला पोलिसांनी केली अटक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीलंकन क्रिकेटपटू कुसल मेंडिस - फाइल फोटो
  • श्रीलंकेची राजधानी कोलंबोपासून 30 कि.मी. अंतरावर असलेल्या पानादुरा शहरात हा अपघात घडला

श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने रविवारी सकाळी सायकलवर जाणाऱ्या 64 वर्षीय वृद्धाला कारने उडवले. या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हिट अ‍ॅंड रन प्रकरणी पोलिसांनी मेंडिसला अटक केली आहे. राजधानी कोलंबोपासून 30 किमी दूर पानादुरा शहरात हा अपघात घडला. पोलिस प्रवक्ता आणि एसएसपी जलिया सेनारत्ने या वृत्ताची पुष्टी केली आहे. मेंडिसला अटक करण्यात आली असून रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याला कोर्टात हजर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मेंडिसने 44 कसोटीत 2995 धावा केल्या आहेत

मेंडिसने श्रीलंकेसाठी 44 कसोटी सामन्यांत 2995 आणि 76 एकदिवसीय सामन्यांत 2167 धावा केल्या आहेत. त्याच्या नावे टी-20मध्ये 484 धावा आहेत. कुसल मेंडिस कोरोना नंतर सुरू झालेल्या प्रशिक्षण शिबिराचा हिस्सा आहे. जुलै महिन्यात श्रीलंका-भारताची मालिका होती, मात्र कोरोनामुळे ही मालिका रद्द करण्यात आली आहे. 

0