आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या संपूर्ण भारतात होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघ तरी मागे कसा राहणार? टीम इंडिया 9 मार्चपासून अहमदाबादला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळणार असून त्यासाठी टीम इंडिया अहमदाबादला पोहोचली आहे.. सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाने जोरदार होळी खेळली आहे, ज्याचा व्हिडिओ BCCI ने शेअर केला आहे.
बीसीसीआयने भारतीय संघाच्या होळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सर्व खेळाडूंना रंग लावताना दिसत आहे. रोहितने प्रथम ड्रेसिंग रुममधील प्रत्येकाला रंग लावला आणि नंतर बसमध्येही जोरदार होळी खेळली गेली
रोहितने घेतला पुढाकार
या व्हिडिओत कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाच्या सर्व सपोर्ट स्टाफला रंग लावताना दिसत आहे. त्यानंतर तो सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, शुभमन गिल यांनाही कर्णधाराने रंग लावले आणि या सर्व खेळाडूंनी रोहितलाही रंगवले. पुढे व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू एकत्र ईशान किशनला रंग लावताना दिसत आहेत, त्यानंतर ईशान कॅमेऱ्यात सर्वांना होळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.
त्यानंतर सर्व खेळाडू बसमध्ये गेले, तिथे रोहितने विराट कोहलीला खूप रंग लावले, त्यानंतर रवींद्र जडेजावर रंगांचा वर्षाव केला, जडेजानेही विराटला रंगात बरसात केली. त्यानंतर सर्व खेळाडूंनी एकमेकांवर रंगाची उधळण करत अमिताभ बच्चनचा 'रंग बरसे' या लोकप्रिय गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे.
टीम इंडियासाठी चौथी कसोटी महत्वाची
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी खेळल्या जात असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकले होते आणि तिसऱ्या म्हणजेच इंदूर कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे, जर भारताने अहमदाबाद कसोटी सामना जिंकला तर केवळ मालिकाच जिंकणार नाही तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे तिकीटही मिळवू शकेल. हा सामना पाहण्यासाठी दोन्ही देशाचे पंतप्रधान हजर राहणार असल्याचे वृत्त आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.