आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया चषक:हाँगकाँगचे गोलंदाज वाजवू शकतात पाकिस्तानचे बारा! पाक-हाँगकाँग सामना सायंकाळी 7.30 ला

शारजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही संघ पहिल्यांदाच टी-२० मध्ये येणार आमने-सामने

आशिया चषकात शुक्रवारी पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये सामना रंगणार आहे. हा सामना शारजातील मैदानावर सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. हाँगकाँगविरुद्ध पाकिस्तानचे पारडे जड आहे. मात्र या छोटेखानी क्रीडा प्रकारात हाँगकाँगचे खेळाडू पाकिस्तानचे बारा वाजवू शकतात. टी-२० त दोन्ही संघ प्रथमच समोरासमोर येत आहेत. हाँगकाँगच्या एहसान खानने गेल्या १० सामन्यांत ६.१३ च्या सरासरीने १९ बळी टिपले आहेत. तर एजाज खानने ७.१७ च्या सरासरीसह १४ गड्यांना बाद केले आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या शादाब खानने ८ सामन्यांत ५.५० सरासरी धावा मोजून १२ गडी बाद केले आहेत.

मोहम्मद नवाजने ७ सामन्यात ८ गड्यांना माघारी धाडले. फलंदाजीत मात्र पाकिस्तानची बाजू भक्कम आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. जिंकणारा संघ सुपर ४ मध्ये पोहोचेल. या दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात भारताने पाणी पाजले. त्यामुळे त्यांना आता विजय आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...