आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup 2022, Team India Vs HongKong Team, Hong Kong Team Wins Hearts Of Indian Fans: Kohli Gifts Jersey With Special Message, Says 'Thanks For Inspiring Us'

हाँगकाँग टीमने जिंकली भारतीय चाहत्यांची मने:कोहलीला भेट दिली खास संदेश असलेली जर्सी, लिहिले 'आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल थॅंक्यू'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया कपमध्ये हाँगकाँगचे दोन्ही सामने खेळून झाले आहेत. यात हाँगकाँगला दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला. बुधवारी भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर हाँगकाँग क्रिकेट संघाने विराटला एक खास गिफ्ट भेट म्हणून दिली. या गिफ्टमुळे हॉंगकॉग टीमने लाखो क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत.

टीमने भारताच्या माजी कर्णधाराला स्पेशल गिफ्ट म्हणून एक जर्सी दिली आहे. या जर्सीचा फोटो माजी कर्णधार कोहलीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

हाँगकाँग क्रिकेट संघाने या जर्सीवर खास संदेशपण लिहिला आहे, यात लिहिले आहे ''एका पिढीला प्रेरणा दिल्याबद्दल विराटचे आभार. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. येणारे दिवस खूप चांगले असणार आहेत. हिंम्मत आणि शुभेच्छांसह टीम हाँगकाँग''. या जर्सीचा फोटो इन्स्टावर शेअर करत विराटने लिहिले की, "या नम्र आणि सुंदर भेटवस्तूसाठी हाँगकाँग टीमचे खूप आभार."

हॉंगकॉंग टीमने विराट कोहलीला स्पेशल गिफ्ट दिले आहे
हॉंगकॉंग टीमने विराट कोहलीला स्पेशल गिफ्ट दिले आहे

भारताचा टॉप-4 मध्ये प्रवेश

बुधवारी आशिया चषकाच्या चौथ्या सामन्यात भारताने हाँगकाँगवर सहज विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 68 धावा केल्या. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना हाँगकाँगला 193 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 59 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. ही खेळी कोहलीच्या कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाची होती. या खेळीदरम्यान कोहलीने 3 षटकार आणि 1 चौकार लगावला.

भारतला प्रत्युत्तर देताना हाँगकाँगने 5 गडी बाद 152 धावा केल्या. हाँगकाँगकडून बाबर हयातने 41 धावा केल्या. भारतीय गोलंदाज आवेश खान आणि अर्शदीप सिंग हे दोघेही जास्त धावा दिल्या. अर्शदीप सिंगने 11 आणि आवेशने 13 च्या अकॉनॉमीने धावा दिल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार, आवेश खान, रवींद्र जडेजा आणि अर्शदीप सिंग यांनी 1-1 विकेट घेतली. भारताने हा सामना 40 धावांनी जिंकला.

सूर्याची तडाखेबंद खेळी

विराट कोहली आणि सूर्यकुमार यांच्यात 92* धावांची भागीदारी
विराट कोहली आणि सूर्यकुमार यांच्यात 92* धावांची भागीदारी

हाँगकाँगविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादव भारतासाठी 'एक्स-फॅक्टर' ठरला. सूर्याने 261 च्या स्ट्राईक रेटने 26 चेंडूत 68 धावा केल्या. सूर्याने मैदानाच्या प्रत्येक बाजूला चौकार आणि षटकार मारले. या खेळीत सूर्याने 6 षटकार आणि 6 चौकार लगावले.

बातम्या आणखी आहेत...