आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 महिला क्रिकेट:यजमान भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघात आजपासून टी-20 मालिका

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान भारतीय महिला संघ आगामी टी-२० वर्ल्डकपच्या तयारीसाठी कसून सराव करत आहे. याच वर्ल्डकपच्या तयारीसाठी आता घरच्या मैदानावर टी-२० मालिकेेचे आयाेजन करण्यात आले. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया महिला संघ खास भारत दाैऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांतील या मालिकेला आज शुक्रवारपासून सुरुवात हाेत आहे. या मालिकेदरम्यान पाच टी-२० सामने खेळवले जाणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली यजमान भारतीय महिला संघ घरच्या मैदानावर या मालिकेत खेळणार आहे. या मालिकेसाठी महाराष्ट्राच्या देविका वैद्य, स्मृती आणि जेमिमाला संधी मिळाली आहे. त्यामुळे आता जेमीमाला आपल्या घरच्या मैदानावर सर्वाेत्तम कामगिरी करण्याची संधी आहे. मािलकेतील पाचही सामने मुंबईतील मैदानावरचा आयाेजित करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...