आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • I Can Be Seen With The Team Again In The Current IPL, I Have No Dispute With The Team, The Owner Of The Team Is Like Srinivasan's Father: Suresh Raina

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल 2020:चालू आयपीएलमध्ये पुन्हा संघासोबत दिसू शकतो, माझ्यात अन् संघात वाद नाही, संघाचे मालक श्रीनिवासन वडिलांसारखे : सुरेश रैना

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रैनाच्या परत येण्यावर महेंद्रसिंग धोनी व संघ व्यवस्थापन निर्णय घेईल - श्रीनिवासन

सुरेश रैना अचानक आयपीएल सोडून भारतात परतल्याने वेगवेगळ्या चर्चेला ऊत आला आहे. आता चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजाने त्यावर मौन सोडले. माझे कुटुंब माझ्यासाठी आवश्यक आहे. मला चिंता होती, मला काही झाल्यास त्यांचे काय होईल. मी माझ्या मुलांना २० दिवसांपासून पाहिले नाही. भारतात परतल्यानंतर क्वारंटाइन असल्याने त्यांना भेटू शकलो नाही, असे रैनाने म्हटले. आता तो पुन्हा चेन्नईसाठी खेळणार नाही, अशी चर्चा होती. त्यावर रैनाने म्हटले, ‘सीएसके माझे कुटुंब आहे आणि माहीभाई माझासाठी सर्व काही आहे. हा कठीण निर्णय होता. माझा व सीएसकेमध्ये वाद नाही. कोणीही विनाकारण साडेबारा कोटी रुपये सोडणार नाही.’ त्याच्या मते तो, आणखी ४-५ वर्षे आयपीएल खेळू शकतो. तो संघासोबत पुन्हा जोडला जाऊ शकतो. संघाचे मालक एन. श्रीनिवासन वडिलांसारखे आहेत, नेहमी पाठीशी उभे राहतात. दुसरीकडे, रैना पुन्हा संघात येण्यावर श्रीनिवासन यांनी म्हटले की, त्यावर महेंद्रसिंग धोनी व संघ व्यवस्थापन निर्णय घेईल.