आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • ICC Announces Group Of T20 World Cup, Know Which Group India And Pakistan Have Been Placed; News And Live Updates

भारत पाकिस्तान एकाच यादीत:आयसीसीने केली टी-20 विश्वचषकाची घोषणा; भारताच्या यादीमध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघाचा समावेश

दुबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विश्वचषकात या प्रकारे होतील सामने

भारत आणि पाकिस्तान सामन्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आयसीसीने टी-20 विश्वचषकाची घोषणा केली आहे. हे सामने यूएई मध्ये होणार असून भारत आणि पाकिस्तान संघ सुपर-12 च्या एकाच ग्रुपमध्ये आहे. हे दोन्ही संघ ग्रुप-2 मध्ये असून यामध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघाचा देखील समावेश आहे.

तर दुसरीकडे सुपर-12 च्या ग्रुप-1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघांना ठेवण्यात आले आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये 6-6 संघाचा समावेश आहे. आयसीसीने या विश्वचषकाचे आयोजन 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान केले आहेत.

विश्वचषकात या प्रकारे होतील सामने

1. सुरुवातीच्या फेरीमध्ये क्वालिफाईग मॅच खेळले जातील.

2. यामध्ये 8 संघादरम्यान हे सामने खेळली जातील. दोन्ही ग्रुपमध्ये 4-4 संघाचा समावेश असेल.

3. दोन्ही ग्रुपमधील टॉप-2 संघ सुपर-12 च्या स्टेजसाठी क्वालिफाय होतील.

4. सुपर-12 मध्ये 6-6 चे 2 ग्रुप बनवण्यात आले आहे. एक संघ 5 सामने खेळणार.

5. सुपर-12 ग्रुप 20 मार्च 2021 च्या रॅकिंगवर तयार केली जाईल.

6. सुपर-12 फेरीनंतर दोन्ही गृपमधील टॉप-2 संघ सेमीफानयलमध्ये पोहचेल.

7. सेमीफायनलनंतर दोन्ही संघात फायनलचा सामना होईल.

बातम्या आणखी आहेत...