आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ICC अवॉर्ड्स ऑफ डिकेड्स:विराट कोहली ठरणार आता दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू

दुबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेहलीपाठाेपाठ शर्यतीत धाेनी, राेहित, अश्विन; महिला गटात मिताली-झुलनमध्ये चुरस

आयसीसीने मंगळवारी अवॉर्ड्स ऑफ डिकेड्ससाठी खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर केली. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला पाच गटांत नामांकन मिळाले आहे. त्याच्या नावे दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, दशतकातील सर्वोत्कृष्ट वनडे खेळाडू, कसोटी खेळाडू, टी-२० खेळाडू आणि स्पिरिट ऑफ द क्रिकेट पुरस्कारासाठी त्याला मानांकन मिळाले. त्याचबरोबर आर. अश्विन देखील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या शर्यतीत आहे. यादरम्यान रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीचे नाव दशकातील सर्वोत्कृष्ट वनडे खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आले. विजेत्या खेळाडूंचा निर्णय मिळालेल्या मतदानाच्या संख्येआधारे ठरेल. त्यामुळे यामध्ये सध्या काेहलीच्या नावाची जाेरदार चर्चा आहे.

मिताली राजला दोन गटांत नामाकंन :

महिलांच्या गटामध्ये भारताची स्टार महिला क्रिकेटपटू अाणि कर्णधार मिताली राजला दोन गटांत नामाकंन मिळाले आहे. तिचे नाव दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि महिला वनडे खेळाडूंमध्ये समाविष्ट आहे. त्याचबरोबर झुलन गोस्वामीला उत्कृष्ट वनडे खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले.

नामाकंन मध्ये सहभागी असलेले खेळाडू पुढीलप्रमाणे

> दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू

विराट कोहली, मलिंगा, स्टार्क, डिव्हिलर्स, रोहित शर्मा, महेंद्र सिंग धोनी, कुमार संगकारा.

> दशकातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटू

विराट कोहली, केन विल्यम्सन, स्मिथ, जेम्स अँडरसन, हेराथ, यासिर शाह.

> दशकातील सर्वोत्कृष्ट टी-२० खेळाडू

कोहली, राशिद, ताहिर, फिंच, मलिंगा,ख्रिस गेल, रोहित शर्मा.

> स्पिरिट ऑफ द क्रिकेट

विराट कोहली, विल्यम्सन, मॅक्युलम, मिस्बाह, महेद्र धोनी, अन्या श्रुबसोल, कॅथरीन ब्रंट, जयवर्धने, डॅनियल व्हिटोरी.

> दशकातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू -

मिताली राज, एलिस पेरी, मेग लेनिंग, सूजी बेट्स, स्टेफनी टेलर, सारा टेलर.

> दशकातील सर्वोत्कृष्ट महिला वनडेपटू -

मिताली, झुलन, लेनिंग, एलिस पेरी, सुजी बेट्स, स्टेफनी टेलर.

> दशकातील सर्वोत्कृष्ट महिला टी-२० खेळाडू

मेग लेनिंग, सोफी डिव्हाइन, एलिस पेरी, डिएंड्रा डॉटिन, एलिसा हीली आणि अन्या श्रुबसोल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser