आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • | ICC Awards Of The Decade Winner Announcement List : Virat Kohli Honored With ICC Cricketer Of The Decade, While MS Dhoni With Spirit Of Cricket Award

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट पुरस्कार:कोहली ICC क्रिकेटर ऑफ द डेकेड, तर धोनी स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराचा मानकरी

दुबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टीव्ह स्मिथ दशकातला सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू, तर राशिद सर्वोत्कृष्ट टी -20 क्रिकेटपटू

आयसीसीने (ICC)सोमवारी क्रिकेट पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. भारतीय कर्णधार विराट कोहलीला 'सर गारफिल्ड सोबर्स मेल क्रिकेटर ऑफ द डेकेड' (2011-2020) आणि 'वन डे प्लेअर ऑफ द डेकेड' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड ऑफ द डेकेड पुरस्काराने गौरवण्यात आले.

कोहलीने 2011 ते 2020 पर्यंत टेस्ट, वनडे आणि टी-20 त 20 हजार 396 धावा केल्या. यादरम्यान त्याने 66 शतके आणि 94 अर्धशतके केली. कोहलीने यादरम्यान 70 डावात 56.97 च्या सरासरीने धावा केल्या. तो 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. तर केवळ वनडेत कोहलीने या दशकात 61.83 च्या सरासरीने 10 हजारांपेक्षा जास्त धावा काढल्या. या दरम्यान त्याने 39 शकते आणि 48 अर्धशतके केली. मागील 10 वर्षांत वनडेत त्याने 112 झेल टिपले.

स्मिथ या दशकातला सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथला 'टेस्ट प्लेअर ऑफ द डेकेड' निवडले. स्मिथने 2011 ते 2020 दरम्यान कसोटी सामन्यात 65.79 च्या सरासरीने 7040 धावा केल्या. यावेळी, त्याची सरासरी सध्याच्या कसोटीतील टॉप -50 फलंदाजांमधील सर्वोच्च आहे. या दरम्यान त्याने 26 शतके आणि 28 अर्धशतके केली.

राशिद दशकातला सर्वोत्कृष्ट टी -20 क्रिकेटपटू

अफगानिस्तानच्या राशिद खानला ICC पुरुष 'टी-20 क्रिकेटर ऑफ द डेकेड' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याने या दशकात टी-20 मध्ये सर्वाधिक 89 गडी बाद केले. यादरम्यान त्याची सरासरी 12.62 होती. त्याने 3 वेळा चार आणि 2 वेळा 5 गडी बाद केले.

धोनीला स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला 'ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड' ने सन्मानित केले. धोनीने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत इयान बेल धावबाद झाल्यानंतरही त्याला मैदानात परत बोलावले होते. चाहत्यांनी याच भावनेसाठी त्याला स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कारासाठी निवडले.

बातम्या आणखी आहेत...