आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ICCची दशकातली सर्वोत्तम टीम:भारतीय खेळाडूंकडे तिन्ही फॉर्मेटचे कर्णधारपद, धोनीकडे वनडे आणि टी-20 तर कोहलीकडे टेस्ट टीमची धुरा

दुबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीसीने या दशकातल्या सर्वोत्तम टी-20, वनडे आणि टेस्ट टीमची घोषणा केली आहे. टी-20 आणि वनडे संघाची धुरा महेंद्र सिंह धोनीकडे सोपवली आहे. तर टेस्ट टीमचे नेतृत्व विराट कोहलीकडे दिले आहे. टी-20 संघात धोनी व्यतिरिक्त रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराला स्थान दिले आहे. या संघात भारतीय खेळाडू व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजचे दोन खेळाडू आणि श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि अफगानिस्तानच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान दिले आहे.

संघात ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅक्सवेल आणि एरॉन फिंच या खेळाडूंचा समावेश आहे. तर वेस्ट इंडीजचे ख्रिस गेल आणि कायरन पोलार्डला स्थान दिले आहे. तर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आणि अफगाणिस्तानच्या राशीद खानचा समावेश केला आहे.

वनडे टीम

रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी (कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इम्रान ताहीर, लसिथ मलिंगा

टी-20 टीम

रोहित शर्मा, क्रिस गेल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (कर्णधार), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा

टेस्ट टीम

एलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यम्सन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा, बेन स्टोक्स, आर.अश्विन, डेन स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अंडरसरन

बातम्या आणखी आहेत...