आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीसीची आज बैठक:बीसीसीआयसमोर टी-20 वर्ल्डकप यजमानपद टिकवण्याचे आव्हान!; टी-२० विश्वचषकासह इतर विषय चर्चेत

दुबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
  • वनडे विश्वचषकात संघांच्या संख्येत वाढ करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता!

काेराेना महामारीमुळे देशात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अापले टी-२० विश्वचषकाचे यजमानपद राखून ठेवणे अधिक अाव्हानात्मक झाले अाहे. या स्पर्धेच्या अायाेजनाबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ (अायसीसी) सखाेल चर्चा करणार अाहे. यासाठी अाज मंगळवारी आयसीसीची व्हर्च्युअल बैठक अायाेजित करण्यात अाली. यामध्ये विश्वचषक अायाेजनासह एफटीपी सायकल, वनडे वर्ल्डकपमधील सहभागी संघांच्या संख्येत वाढ करण्याच्या विषयावर सखाेल चर्चा हाेणार अाहे. याच बैठकीसाठी बीसीसीआय अध्यक्ष साैरव गांगुली अाणि सचिव जय शहा दुबईला जाणार हाेते. मात्र, हे दाेघेही अाता मुंबईतून अाॅनलाइन या बैठकीत सहभागी हाेतील.

भारतामध्ये काेराेनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली अाहे. याच काेराेनामुळे अायपीएलची स्पर्धा स्थगित करण्यात अाली. हाच धाेका लक्षात घेऊन अायसीसीने टी-२० विश्वचषकासाठी पर्यायी म्हणून यूएईची यजमानपदासाठी निवड करून ठेवली अाहे. मात्र, भारतामधील परिस्थिती अाटाेक्यात येईल, त्यामुळे याबाबतचा निर्णय हा जुलैनंतर घेण्यात यावा, असे साकडे बीसीसीअायने अाता अायसीसीला घातले अाहे.

हे मुद्दे असतील अधिक फाेकसमध्ये
कर सवलतीवर काथ्याकूट हाेणार

बीसीसीअाय अाणि अायसीसी यांच्यात गत २०१६ पासून कर सवलतीच्या विषयावर चर्चा सुरू अाहे. अाता या बैठकीत हा मुद्दा निकाली लागण्याची शक्यता अाहे. याच सवलतीसाठी बीसीसीअायने अापल्या भारत सरकारची अनेक वेळा चर्चा केली. मात्र, यात काेणतीही सूट मिळाली नाही. यातून अाता बीसीसीअायचे ९०५ काेटींचे नुकसान हाेण्याची शक्यता अाहे.

अाॅलिम्पिक, काॅमनवेल्थमध्ये क्रिकेट
क्रिकेटला जाागतिक स्तरावर चालना देण्यासाठी अायसीसीने कंबर कसली. यातून अाता अाॅलिम्पिक अाणि काॅमनवेल्थ स्पर्धेतही क्रिकेटचा समावेश करण्यासाठी अायसीसी सक्रिय अाहे. याशिवाय महिला क्रिकेट स्पर्धेंच्या अायाेजनावरही अधिक चर्चा हाेण्याची शक्यता अाहे. २०२८ अाॅलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटला सहभागी करण्यासाठी अायसीसी अधिक प्रयत्नशील अाहे. त्यामुळे याबाबतचा ठाेस असा निर्णय घेऊन क्रिकेटला चालना देण्याचा अायसीसीचा मानस अाहे. अाॅलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची अनेक दिवसांची मागणी अाहे.

एफटीपीवर चर्चा
दुबईतील बैठकीदरम्यान फ्यूचर टूर प्राेग्राम (एफटीपी) सायकलवर सखाेल चर्चा हाेईल. यामध्ये २०२३ ते ३१ दरम्यान स्पर्धा अायाेजनाचा निर्णय घेतला जाईल. वनडेच्या विश्वचषकातील सहभागी संघांची १० एेवजी अाता १४ करण्याबाबत सर्वांची मागणी अाहे.

बातम्या आणखी आहेत...